Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा
Showing posts with label निबंध. Show all posts
Showing posts with label निबंध. Show all posts

Sunday, 5 December 2021

December 05, 2021

सवयी

                सवयी 



              (Habits

काहीही वारंवार करणे म्हणजे सवयी होय, आम्हाला सगळ्या सवयी आहेत. आम्हाला एखादी सवय एकदा लागली, मग आम्ही कोणताही विचार न करता ती सवय लावून घेतो. सवयी या चांगल्या आणि वाईटही आहेत. सूर्योदयापूर्वी उठणे, वक्तशीरपणा, दीर्घोद्योगी, स्वच्छपणा या चांगल्या सवयी आहेत. बिनतक्रार स्वीकारणे, असभ्य भाषा वावरणे, चोरी करणे या वाईट सवयी आहेत. महत्त्वाच्या चांगल्या सवयी वाढवता येतात आणि वाईट सवयी दूर रा येतात. सवयी तुमच्या प्रथम कमतरता, परंतु तुम्ही शक्तिशाली झाला तर कशाही सवयीला तुम्ही थांबवू शकता. म्हणून चांगल्या सवयी मनावर बिंबवल्या तर तुमच्यासह तुमच्या जीवनात येईल. प्रत्येक आदरणीय व्यक्ती चांगला सवयी असतात. सवयी माणूस लावतो, म्हणून माणूस सवयी लावून घेतो किंवा दूर सारतो. चांगल्या सवयीमुळे वेळेचे व्यवस्थापन, दीर्घोद्योगी, संवेदनशीलता येते. व्यक्तीला यशस्वी बनवते आणि सर्वोत्तम क्षेत्र निवडता येते. दुसऱ्या सवयी जसे मद्यपान, बिनतक्रार स्वीकारणे आणि चोरी करणे या वाईट सवयी व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करते. वाईट सवयी असणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार आणि उपहास करतात. लहान मुलांवर चांगल्या सवयी योग्य वेळेत बिंबवता येतात. लहान मुलाला वाईट सवयी लागल्या तर त्या दीर्घकाळ राहतात. म्हणून चांगल्या सवयी मुलावर रुजवण्यासाठी पालकांची जबाबदारी असते. सवयी तुमचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मदत करतात. चांगल्या सवयी असणाऱ्या व्यक्तीच यशस्वी होतात.


December 05, 2021

नदीचे आत्मवृत्त

         नदीचे आत्मवृत्त 



(The Autobiography of a River)

        मी विस्तारित आणि अफाट नदी आहे. माझे घर बर्फीय उत्तरेच्या टेकड्यात आहे. माझा उगम हा हिम नदी आणि इथपर्यंत माझ्या प्रवाहाची सुरुवात पर्वताच्या बाजूने झाली. माझे वडील बर्फीय शिखर आहे. माझ्या उगमस्थानातून मला ओढे, नाले येऊन मिळतात आणि माझे पात्र अफाट होते. माझ्या प्रवासाची सुरुवात अगदी साधी आहे. माझ्या प्रवासाचे ध्येय नेहमी एकच आहे प्रचंड समुद्रात सामील होणे, माझे वाहणे सरळ, अनेकविध शहरातून व खेड्यांतून मी लोकांच्या जगण्याची साक्षीदार आहे. मी प्रत्येक ठिकाणी प्रवाहाच्या माध्यमातून जाते. मी शांत साक्षीदार आहे. मी पाहते परंतु बोलू शकत नाही. मी शेती सकस बनवते आणि लोकांना पाण्याचा पुरवठा करते. धरण बांधल्यावर मला ओलांडून जातात. धरणाच्या बाजूने माझा स्तर विस्तारतो आणि माझ्या पाण्याचा वापर शेती आणि विजेसाठी होतो. पावसाळ्यात मी खूप विस्तारते आणि प्रक्षुब्ध होते. कधी-कधी मी पूर्णतः भरून वाहू लागते. पावसाळ्यात पूर स्थितीवेळी नेहमी विध्वंस करण्याची पूर्ण क्षमता माझ्यात आहे. घरे, गुरेढोरे यांचा नाश करते आणि शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. माझ्या प्रवाहात अनेक लोक वाहून जातात. परिणामावर विसंबवून राहू नका तर मी मानवाच्या खूप उपयोगी आहे. माझे पाणी शेतीसाठी, पिण्यासाठी, विजेच्या निर्मितीसाठी, धुण्यासाठी आणि कारखान्यात वापरतात. वसंत ऋतूत गवत आणि जंगली फुले माझ्या काठावर येतात. सायंकाळी लोक माझ्या काठावर बसून गारवा अनुभवतात. लोक माझ्या पाण्यात अंघोळ करतात आणि देवाची प्रार्थना करतात. कधी-कधी लोक येऊन माझी आराधना, पूजा करतात.

माझा अंतिम प्रवास समुद्र आहे. कधी वळसे घालून तर कधी सरळ मार्गे समुद्राकडे सतत वाहत असते. ०००

December 05, 2021

प्राणिसंग्रहालयातील वाघाचे आत्मवृत्त

 प्राणिसंग्रहालयातील वाघाचे आत्मवृत्त 



(The Autobiography of a Tiger in a Zoo) 

          मी रॉयल बेंगाल वाघ आहे, जगातील सर्व प्राण्यांत मी आक्रमक आहे. माझे लांब, डौलदार शरीर, तीक्ष्ण सुळे आणि काळे पट्टे आणि त्यावर टवटवीत केस आहेत. पण मी प्राणिसंग्रहालयात आहे, पिंजऱ्यात मी किती दु:खी आहे या बंद गजांच्या पिंजऱ्यात! या माझ्या जंगलाच्या मानाने ही जागा हालचाल करण्यास खूपच अपुरी आहे. मी चांगले बघतो आणि नंतर पुरेसे मांस खातो, तरीही मी पूर्णतः सुखी नाही. प. बंगालमधील सुंदरबनातील अगोदरची वर्षे मला आठवतात. मी माझ्या आईसोबत जंगलात मुक्त आणि आनंदाने भटकत असे. सर्व प्राणी मला घाबरून होते. माझी आई रात्री शिकार करी आणि मला खाऊ घाली. मी जंगलात खूप सुखी होतो. तिथे एक लहानशी निर्मळ पाणथळ होती. मला ●आठवते, पाणथळमध्ये चिंतामुक्त होऊन माझ्या आईसोबत मी पोहत असे. या सुवर्णकाळाचा उपयोग मी आळशीपणात घालवला. एक दिवस बेकायदेशीर शिकार करणाऱ्या समूहाच्या बंदुकीची गोळी माझ्या आईला लागली आणि ती मृत्युमुखी पडली. मी तिला बरेच दूर घेऊन गेलो. मी छावा होतो आणि माझ्या आईला मृत्युमुखी पडलेले पाहून खूप घाबरलो. मी प्राणिसंग्रहालयात होतो. पहिल्यांदा मी माझ्या आईला आणि जंगलाला आठवू लागलो. हळूहळू मी प्राणिसंग्रहालयात जीवन जगू लागलो. आता मी पूर्णतः प्रौढ आणि उत्कृष्ट वाघ आहे. जर मी गर्जना केली तर माझा राखणदार पळतच माझ्याकडे येतो. माझा राखणदार माझी चांगली काळजी घेतो; परंतु माझे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यामुळे मी दुःखी झालो आहे.

प्रत्येक दिवशी भेट देणारे गर्दी करतात आणि माझ्याकडे टक लावून पाहतात. माझ्यातील काही आश्चर्यकारक सौंदर्य पाहून काही मला त्रास देतात. काही भेट देणारे काठी आणि लोखंडी गजाने त्रास देऊन मला रागवण्यास भाग पाडतात. जर मी मुक्त असतो तर भेट देणाऱ्यास चांगला धडा शिकवला असता. ओ! मी मात्र मुक्त नाही, जर माझी आजारपणाची व्यवस्था केली गेली नाही तर मी नसणार. मी खरोखर जंगलाची खूप आठवण करतो. माझे स्वप्न आहे की, मी परत • जंगलात जावे. मी सभोवती धावेन, पाणथळमध्ये पोहीन आणि शिकार करताना काही खेळही खेळेल. काही मला आनंदी बनवेल. परंतु स्वप्न हे स्वप्नच आहे आणि हे क्वचितच सत्यात उतरते.

December 05, 2021

माझा जिवलग मित्र/मैत्रिण

माझा जिवलग मित्र/मैत्रिण


      (My Best Friend) 

              माझी जिवलग मैत्रीण गुंजन आहे. ती मधुर आवाजात बोलणारी मुलगी आहे. आम्ही वर्गात मिळून अभ्यास करतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे. ती माझ्या शेजारीच राहते व आताही माझी वर्गमैत्रीण आहे. गुंजन ही उंच आणि सडपातळ आहे. तिचे डोळे शुभ्र आहेत आणि ती खूप सुंदर दिसते. गुंजनचा स्वभाव दयाळू आहे. ती चांगल्या प्रकारे अभ्यास करते. ती चांगला वक्ता आहे. ती एक चांगली कलाकार आणि उत्कृष्ट नर्तिका आहे. ती शाळेत खूप प्रसिद्ध आहे. मी गुंजनच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करते, तिने मला वक्तशीरपणाचे महत्त्व शिकवले. ती निःस्वार्थी आहे. आम्ही बहिणीसारख्या आहोत. आम्ही सर्वांबरोबर प्रेमळपणे राहतो. आम्हाला नेहमी सोबत राहायला आवडते.



December 05, 2021

माझा वाढदिवस

              माझा वाढदिवस



             (My Birthday) 

              माझा वाढदिवस ५ नोव्हेंबरला होता आणि यावर्षी आम्ही मोठी मेजवानी दिली. मी माझ्या शाळेत माझ्या वर्गमित्रांसोबत चॉकलेट वाटले. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझे अभिनंदन केले. माझ्या शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी मला आशीर्वाद दिला. संध्याकाळी मी माझ्या पालकांना फुग्यांनी घर सजवायला मदत केली. ते फुगे नारंगी, लाल, गुलाबी, निळे आणि पिवळे होते. मी माझ्या मित्रांना आणि नातेवाइकांना मेजवानीसाठी आमंत्रित केले. मी केक कापला आणि खूप साऱ्या भेटवस्तू स्वीकारल्या. त्यानंतर आम्ही जेवण केले. नाचगाणे केले, खूपसारा आनंद लुटला. माझ्या आईने नियोजन करून विविध खेळ आणि कृती मुलांना करायला लावल्या, ते जादुई खेळासारखे होते. माझ्या सर्व मित्रांनी मेजवानीचा आनंद घेतला.

Saturday, 4 December 2021

December 04, 2021

नाताळ

                नाताळ       (Christmas) 



                ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा मुख्य सण आहे. तो दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण जीजस खिस्त यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. ख्रिश्चन हे मध्यरात्री चर्चमध्ये जाऊन ख्रिसमसमध्ये सहभागी होतात. तेथे दीर्घकाळ प्रार्थना केली जाते. ख्रिसमस आनंदाचे गीत गातात. त्यानंतर चर्चमध्ये एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. 

             त्यानंतर दुसऱ्या दिवशी, नवीन स्वच्छ कपडे परिधान करतात. ते एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच स्वीकारतातही. प्रत्येक जण एकमेकांना भेटताना भेटवस्तू व केक देतात.                    सामान्यपणे ख्रिसमसच्या दरम्यान येशूचा जन्म झाल्याचा देखावा पहावयास मिळतो. ते दृश्य येशूच्या जन्माचे असते. ख्रिसमसचे झाड आणि सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू व मिठाई देताना दिसतात. ख्रिसमसचा सण हा सर्वांनी मिळून आनंद साजरा करण्याचा सण आहे.

Thursday, 2 December 2021

December 02, 2021

आजच्या काळातील संगणक

आजच्या काळातील संगणक 



(Computers in Today's World) 

         आजच्या युगात संगणकीय उद्योग व्यवसाय हा सर्वांत भरभराटीला आलेला उद्योग आहे. कॉम्प्युटरसाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामध्ये सतत सुधारणा होत आहे. संगणकीय तंत्रज्ञानामध्ये वायूच्या वेगाने प्रगती होत आहे. भरपूर कामे पार पाडणारे संगणक म्हणजे एक अत्यंत सुधारित अशा प्रकारचे यंत्र आहे. खूप लोकांना खूप वेळ करावे लागणारे काम संगणकाद्वारे काही मिनिटांतच पूर्ण केल्या जाऊ शकते, परंतु संगणकाद्वारे काम करवून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संगणकासमोर बसून तशा सूचना द्याव्या लागतात. त्यामुळेच संगणक त्याची कामे पूर्ण करण्यासाठी माणसावर अवलंबून असतो. आजकाल आपली सर्व कामे इतकी संगणकप्रधान झालेली आहेत की, जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला संगणक वापरावा लागतो. कुठलेही काम करताना, कुठेही गेलो असताना प्रत्येक काम हे आपल्याला संगणकीकृत झालेले दिसते.

खाद्यपदार्थ मागवण्यापासून ते जगातल्या दुसऱ्या भागात वसलेल्या व्यक्तीशी बोलण्यापर्यंत सर्व कामे संगणकाद्वारे केली जातात. इंटरनेटच्या साहाय्याने तर संगणकाने जग छोटे बनवले आहे. इंटरनेट आणि संगणकामुळे प्रत्येक जण घरबसल्या बिल भरणे, खरेदी, संपर्क, वाचन, अर्ज भरणे आणि अशा प्रत्येक गोष्टी करू शकतो. संगणकाने निश्चितच आपले आयुष्य सोपे आणि आरामदायी केले आहे. तेही कमी मनुष्यबळासहित संगणकीकरणामुळे वेळेआधीच निवृत्ती आणि बेरोजगारी यात प्रचंड वाढ झाली आहे. तसेच त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. आज सर्व लोक त्यांचा जवळजवळ सर्व वेळ संगणकावर काम करण्यासाठी अथवा इतर गोष्टींसाठी खर्च करतात. त्यामुळे लोक आळशी झाले आहेत. त्यामुळे संगणक हा सुवर्णमध्य साधून वापरणे गरजेचे झाले आहे.