Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 4 December 2021

नाताळ

                नाताळ       (Christmas) 



                ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा मुख्य सण आहे. तो दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण जीजस खिस्त यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. ख्रिश्चन हे मध्यरात्री चर्चमध्ये जाऊन ख्रिसमसमध्ये सहभागी होतात. तेथे दीर्घकाळ प्रार्थना केली जाते. ख्रिसमस आनंदाचे गीत गातात. त्यानंतर चर्चमध्ये एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. 

             त्यानंतर दुसऱ्या दिवशी, नवीन स्वच्छ कपडे परिधान करतात. ते एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच स्वीकारतातही. प्रत्येक जण एकमेकांना भेटताना भेटवस्तू व केक देतात.                    सामान्यपणे ख्रिसमसच्या दरम्यान येशूचा जन्म झाल्याचा देखावा पहावयास मिळतो. ते दृश्य येशूच्या जन्माचे असते. ख्रिसमसचे झाड आणि सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू व मिठाई देताना दिसतात. ख्रिसमसचा सण हा सर्वांनी मिळून आनंद साजरा करण्याचा सण आहे.

No comments:

Post a Comment