सहावी नागरिकशास्त्र
४. शहरी स्थानिक शासन संस्था
१) शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात?
उत्तर :शहरांमध्ये पुढील समस्या
(१) निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी
(२) जागेची टंचाई
३) वाहतुकीची सतत होणारी कोंडी
४) कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या
(५) वाढती गुन्हेगारी
(६) वाढत्या गलिच्छ वस्त्या व त्यात मोठया प्रमाणावर राहणारी लोकसंख्या व आरोग्याच्या सोयींची कमतरता
(७) पिण्याच्या पाण्याची टंचाई
-------------------
२) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. उत्तर :महानगरपालिकेचा कारभार पुढील विविध समित्यांमार्फत काल
(१) स्थायी समिती
(२) शिक्षण समिती
(३) आरोग्य समिती
(४) परिवहन समिती
(५) पाणी पुरवठा समिती इत्यादी.
-------------------
(३) खेड्यामध्ये मिळणाऱ्या अशा कोणत्या सोयी शहरांमध्ये मिळतात?
उत्तर :खेड्यांमध्ये न मिळणाऱ्या पुढील सोयी आपणाला शहरांमध्ये मिळतात :
(१) उदयोग आदि व्यवसायाच्या संधी
(२) सेवाक्षेत्र
(३) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारा रोजगार
(४) मनोरंजनाद विविध साधने
(५) कला व साहित्य यांच्या सोयी
(६) वाहतुकीच्या विविध सोयी
-------------------
४) नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग कोणते ते लिहा. उत्तर :
(१) नगरपरिषदेला घरपट्टी, शिक्षणकर, पाणीपट्टी, बाजारकर, उत्सव कर यादवारे उत्पन्न मि तसेच
(२) राज्य शासनाकडूनही नगरपरिषदेला अनुदान मिळते.
-------------------
५). नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो ?
उत्तर :नगरपरिषदेच्या आवश्यक कामामध्ये पुढील कामांचा समावेश होतो
(१) पिण्याच्या पाण्याचा - पुरवठा करणे.
(२) सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिःसारणाची व्यवस्था करणे.
(३) सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे.
(४) जन्म-मृत्यू व विवाह यांच्या नोंदी करणे.
(५) प्राथमिक शिक्षणाची सोय करणे.
-------------------
६).नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते?
उत्तर : (१) पूर्णतः खेडेही नाही आणि पूर्णतः शहरही नाही अशी काही ठिकाणे राज्यात असतात.
(२) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात; तेथील कारभार पाहण्यासाठी 'नगरपंचायत' ही स्थानिक शासनसंस्था असते.
-------------------
७). नगरपरिषदेच्या अध्यक्षाची कामे लिहा.
उत्तर :नगरपरिषदेच्या अध्यक्षाला पुढील कामे करावी लागतात .
(१) नगरपरिषदेच्या होणाऱ्या सर्व सभांचे अध्यक्ष स्थान स्वीकारणे.
(२)सभेच्या कामकाजाचे नियमन करणे
(३) नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवणे
(४) शहराच्या विकासाच्या योजनांबाबत निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे
-------------------
८)नगरपरिषदेची ऐच्छिक कामे :
उत्तर :(१) सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे.
(२) रस्त्यांसाठी जागेचे संपादन करणे.
(३) गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे.
(४) सार्वजनिक बागा व उदयाने बांधणे.
(५) गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे.
(६) ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, व्यायामशाळा, मनोरंजन गृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे.
-------------------
९). महानगरपालिका आयुक्ताची कामे :
उत्तर :(१) महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख या नात्याने प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते.
(२) महानगरपालिकेच्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो.
(३) महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. (४) महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो.
-------------------
१०)महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग :
उत्तर : महानगरपालिकेला पुढील मार्गांनी उत्पन्न मिळते :
(१) घरपट्टी
(२) पाणीपट्टी
(३) मालमत्ता कर
(४) व्यवसाय कर
(५) मनोरंजन कर
(६) कर्ज उभारणी
(७) राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान.
-------------------
No comments:
Post a Comment