■प्र. पुढील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा :
(१) भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.
उत्तर -आयात
•••••••••••••••••••••••••
(२) कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी
पाठवला जातो.
उत्तर- निर्यात
•••••••••••••••••••••••••
(३) जपान आपेक (APEC) देशांना यंत्रसामग्री पाठवतो
उत्तर-निर्यात
•••••••••••••••••••••••••
■प्र. पुढीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(१) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.
उत्तर : भारत हा देश स्वयंपूर्ण नाही.
•••••••••••••••••••••••••
(२) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, त्या ठिकाणी त्या वस्तूंना मागणी नसते.
उत्तर : ज्या ठिकाणी एखादया वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो.
•••••••••••••••••••••••••
* (३) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.
उत्तर : स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते.
•••••••••••••••••••••••••
(४) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.
उत्तर : आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते.
•••••••••••••••••••••••••
■प्र. पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा .
व्यापार - व्यापार प्रकार
(१) सृष्टीने किराणा दुकानातून अर्धा किलो साखर आणली.
उत्तर-किरकोळ व्यापार
•••••••••••••••••••••••••
(२) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
उत्तर- देशांतर्गत व्यापार
•••••••••••••••••••••••••
(३) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.
उत्तर-आंतरराष्ट्रीय व्यापार
•••••••••••••••••••••••••
(४) सदाभाऊंनी मार्केटयार्डामधून आपल्या दुकानात विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत आणला.
उत्तर-घाऊक व्यापार
•••••••••••••••••••••••••
■ व्यापार संतुलन प्रकारातील फरक सांगा.
उत्तर : (१) प्रतिकूल व्यापार संतुलन : जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते.
(२) अनुकूल व्यापार संतुलन : जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते.
(३) संतुलित व्यापार : जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते, त्या अवस्थेला संतुलित व्यापार असे म्हणतात.
•••••••••••••••••••••••••
■ जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.
उत्तर : (१) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे.
(२) व्यापारविषयक मतभेद हाताळणे.
(३) सदस्य-राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे.
(४) विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
•••••••••••••••••••••••••
■ आशिया खंडातील महत्त्वाच्या व्यापारी संघटनेचे कार्य लिहा.
उत्तर : आसियान (ASEAN) ही आशिया खंडातील महत्त्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास घडवून आणणे.
(२) सदस्य देशांत सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे.
(३) प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे.
(४) सदस्य देशांना व्यापारवृद्धीसाठी कर-सवलती देण्यास प्रवृत्तकरणे.
•••••••••••••••••••••••••
■शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा.
उत्तर : (१) पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असे.
(२) विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो. त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो. त्यानंतर शहरातील सुपर मार्केट/मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो.
(३) सादरीकरणाने प्रभावित होऊन, सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात.
(४) अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. त्याच्या मालाला पूर्वीपेक्षा अधिक किंमत मिळते.
(५) नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते.म्हणजेच, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे.
No comments:
Post a Comment