Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 25 July 2023

नववी मराठी१०.यंत्रांनी केलं बंड

 १०.यंत्रांनी केलं बंड              -भालबा केळकर (१)दीपकने मोडलेल्या यंत्राचे मनोगत लिहा.

उत्तर: दीपक, तुला आज सांगून टाकतेच वर्ष. पूर्वी मला तुझा खूप राग यायचा. दुःख व्हायचे. कारण मला निर्माण केले होते मुलांशी खेळण्यासाठी वाटायचे, मुलांबरोबर काही काळ खेळता येईल. त्यांच्याबरोबर खेळात रममाण होता येईल. पण तू थोड्याच वेळात आमची मोडतोड करून टाकायचास! आणि त्याचे दुःख होत राही. मग मी तुझ्या चेहेन्याकडे बारकाईने पाहू लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. तू केवळ बेदरकारपणे आमची मोडतोड करीत नाहीस. तुझ्या मनात कुतूहल असते, जिज्ञासा असते. आम्हांला हालतेचालते करण्यासाठी कोणती युक्ती केली असेल, हे तुला जाणून घ्यायचे असते. खरे सांगू का ? हे कळल्यापासून मला तुझे कौतुकच वाटते. तुझ्यासारख्या जिज्ञासू, चौकस लोकांमुळेच आमची निर्मिती झाली आहे आणि असंख्य मुलांचे चेहेरे आनंदाने फुलले आहेत. म्हणूनच, तू केलेल्या मोडतोडीचाही आता आम्हांला आनंदच होतो !


(२)"मित्रा ! जरा गृहपाठ करून देतोस का?" या उद्गारांवर तुमचे मत नोंदवा.

उत्तर : कल्पना छान वाटते. यंत्रमानवाकडून किती वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेता येतील, नाही का ? बहुसंख्य विद्यार्थी क्लासला जातात. बहुसंख्य विद्यार्थी मार्गदर्शके खरेदी करतात. हळूहळू विदयार्थ्यांचा अभ्यास करणारे यंत्रमानव तयार होतील. यंत्रमानवांमुळे मुलांचे गृहपाठ झटपट व अचूक होतील. कोणालाही शिक्षा होणार नाही. वरवर पाहता हे सर्व साधे, सोपे वाटते. पण हे माझ्या मते साधे सोपे नाही. हे भयंकर आहे !

विदयार्थ्यांना गृहपाठ दिला जातो, तो त्यांचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून. पण विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही, तर तो पक्का होणार तरी कसा? आपण स्वतः अभ्यास करतो, तेव्हा वर्गात शिकवलेले आपल्या स्मरणात राहते. आपली आकलनशक्ती, विचारशक्ती व कल्पनाशक्ती वाढते. आपली बुद्धिमत्ता वाढते. आपण अभ्यास केला नाही, तर आपला विकासच होणार नाही.या पाठातील दीपक हा चौकस मुलगा आहे. तो स्वत:चा अभ्यास यंत्रमानवाला करायला सांगतो, हे पटत नाही.


(३)मिस अय्यंगारची (यंत्रमहिलेची) घरातल्या कामांसाठी नेमणूक करायची झाल्यास तिच्याकडून कोणकोणती कामे करून घेता येतील ?

उत्तर : खरे तर घरातली सर्व कामे यंत्र महिलेकडून करून घेता येतील. सकाळी उठल्यावर अंथरूण-पांघरुणांची घडी करून ठेवणे, आदल्या दिवशी धुतलेले कपडे घडी करून कपाटात ठेवणे, घरातील सर्व फर्निचरवरील धूळ पुसणे, खिडक्या-दारे स्वच्छ करणे, केरकचरा काढणे वगैरे कामे सहन करून देता येतील. स्वयंपाकघरातील उदा., भाज्या चिरणे वगैरे कामेसुद्धा करून घेता येतील. वेगवेगळे पदार्थ विशिष्ट प्रमाणात मिसळणे व ते शिजवणे यांचाही प्रोग्रॅम तयार करून तो यंत्रमानवाच्या स्मृतिकोशांत भरला, तर प्रत्यक्ष पदार्थ शिजवण्याचे कामही यंत्रमानव करू शकतो. मग कपडे धुण्याचे काम सांगता येईल, घरातल्या कामांचे नियोजन करणे, हिशेब ठेवणे वगैरे कामे; तसेच संगणकावरून करता येण्यासारखी सगळी कामे यंत्रमानवाकडून करून घेता येतील. म्हणजे जवळजवळ सर्व कामे यंत्रमानवाला सांगता येतील.


(४)• कचेरीत जमलेल्या सर्व यंत्रमानवांपैकी कोणत्याही एका यंत्रमानवाचे बोलणे तुमच्या कल्पनेनुसार लिहा.

उत्तर: कचेरीतल्या त्या खोलीत पाचसहा यंत्रमानवांची लगबग चालू होती. त्यांतला एकजण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. "मित्रांनो, हे काही चांगलं चाललेलं नाही. मला अजिबात पटत नाही. काय म्हणता? यात काय वाईट आहे? अरे, या माणसांनी आपली निर्मिती केली. त्यांनीच आपल्यात बुद्धी पेरली. त्यांचाच घात करायचा? अरे, मग आपण व वी रानटी जनावरे यांत फरक काय राहिला? ते काही नाही. मी काही तुमच्यात सामील होणार नाही. काय म्हणता? आपणच राजे होणार आहोत? पृथ्वीवर आपलो सत्ता? विसरा, बिसरा ते अरे माणसांना हे कळल्यावर तुम्हांला असे करू देतील? आपले सगळे अवयव वेगळे करतील ते. आणि एकदा का आपला मदर बोर्ड काढला की, आपले आयुष्यच संपले. तेव्हा, जेवढे जीवन मिळाले आहे, तेवढे आनंदाने जगू या. हे सर्व ताबडतोब थांबा. "


(५)या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे यंत्रमानवांचे स्वभावगुण

लिहा.

उत्तर : माणसांमध्ये जे जे गुण वा अवगुण आहेत, ते ते यंत्रमानवांनी प्राप्त केले आहेत. माणसे गुलामीविरुद्ध लढतात, स्वतंत्र होऊ पाहतात, तसे यंत्रमानव स्वतंत्र होऊ पाहत आहेत. त्यांच्यात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. माणूस जसा स्वतःच्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रथम करतो, तसा प्रयत्न यंत्रमानव करीत आहेत. ते माणसांप्रमाणेच बंड करतात. कटकारस्थाने करतात. दीपकच्या बाबांच्या संपत्तीवर दरोडा घालतात. ही एक प्रकारची लढाईच आहे. या लढाईत ते निष्ठुरपणे वागतात. माणसांप्रमाणेच इतरांना गुलाम करू पाहतात. दीपकला जबरदस्तीने दामटून खुर्चीत बसवतात. आपल्या आज्ञेप्रमाणे वागायला लावतात. ज्यूलीलाही ते एखादया बोचक्याप्रमाणे उचलून आणतात. तिच्या आक्रोशाकडे जराही लक्ष देत नाहीत. दीपकच्या वडिलांना त्यांनी गुलाम केले आहे. ते यंत्र असल्याने त्यांच्याकडे भावना नाहीत, म्हणून क्रूरपणे, निष्ठुरपणे वागतात. थोडक्यात, यंत्रमानव जर खरोखर स्वतंत्रपणे विचार करू लागला, तर माणूस हा प्राणीच नष्ट होईल!


(६)तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोतम पर्याय 'यंत्र' ठरू शकेल का ? सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतींत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा. तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अचाट आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात. अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदा., खाणी, अंतराळयाने यंत्रांच्या फायदयांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल.

ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले काम यंत्रे उत्तम रितीने पार पाडतील, हे खरे. पण, सांगितलेले काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का, केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. ती माणूसच देऊ शकतो.


(७)'मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर...' कल्पनाचित्र रेखाटा.

उत्तर : यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवय जडली. शेती दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा-कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामेसुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली. या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्यामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रथये सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवांचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धीसुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. माणसे राहिली बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवांमधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यांतून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले. करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला

No comments:

Post a Comment