Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 23 July 2023

नववि भूगोल, 8) अर्थशास्त्राशी परिचय


■प्र. एका वाक्यात उत्तरे लिहा :

●(१) व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर : व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते.

-------------------------------

* (२) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?

उत्तर : अर्थशास्त्र (Economics) ही संज्ञा OIKONOMIA (ओईकोनोमिया) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.

-------------------------------

(३) ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कोणता ?

उत्तर : ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे.

-------------------------------

(४) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर : भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते.

-------------------------------

 (५) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर : देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप  करणे म्हणजे 'जागतिकीकरण' होय. 

-------------------------------

■प्र. स्पष्ट करा :

 (१) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

उत्तर : (१) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कारण कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात.

(२) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.

(३) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यांतून येते. त्यास 'आर्थिक व्यवस्थापन' असे म्हणतात.

-------------------------------

 (२) भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

उत्तर : (१) भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे.

(२) भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व सरकार यांच्यात विभागलेली असते. 

(३) खासगी क्षेत्रातील उदयोजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशीलअसते.

(४) अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

-------------------------------

No comments:

Post a Comment