Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday, 23 July 2023

नववि भूगोल 10 )नागरीकरण

■प्र. महत्त्व सांगा/फायदे लिहा :

(१) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण.

उत्तर : (१) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला साहाय्यभूत ठरते.

(२) ग्रामीण भागात शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते.

(३) शेतीची कामे यंत्रांद्वारे केल्याने, मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले.

(४) अतिरिक्त झालेला कामगारवर्ग कामधंदयाच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने, शेतीवरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला. त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले.

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा :

(१) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.

उत्तर : (१) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात.

(२) नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उदयोगांची ठिकाणे बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने, उपनगरातून प्रवास करावा लागतो.

(३) प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते. मात्र, शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो.

(४) वाहतूक सेवा पुरेशा उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खासगी वाहनातून प्रवास करतो.

(५) सार्वजनिक वाहने व प्रचंड प्रमाणात असलेल्या खासगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

(६) पुढे दिलेल्या चित्रात मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी स्पष्ट होते. 

•••••••••••••••••••••••••

(२) औदयोगिकीकरण व वायुप्रदूषण.

उत्तर : (१) औदयोगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे.

(२) ऊर्जासाधने व यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते.

(३) उत्पादन कार्य आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण उद्भवते. 

•••••••••••••••••••••••••

 (३) स्थलांतर व झोपडपट्टी.

उत्तर : (१) राज्यांतर्गत ग्रामीण भागातील विस्थापित लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात.

(२) त्याचप्रमाणे देशाच्या अविकसित भागातील लोक मुंबईसारख्या

औदयोगिक महानगरात नोकरी-व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात.

(३) त्यामुळे शहरांच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते. त्या प्रमाणात शहरांतील निवासव्यवस्था वाढत नाही.

(४) स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने, त्यांना शहरातील महागडी निवासस्थाने परवडत नाहीत.

(५) असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत, तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. अशा वस्तींना झोपडपट्टी असे म्हणतात आणि त्या अनिर्बंधपणे वाढतच जातात.

(६) स्थलांतर व झोपडपट्ट्या यांच्यातील सहसंबंध पुढील चित्रातून स्पष्ट होतो. 

•••••••••••••••••••••••••

 (४) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी.

उत्तर : (१) स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यांत असते.

(२) झोपडपट्ट्यांत किमान नागरी सोईसुविधाही नसतात.

(३) स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत नाही.

(४) त्यामुळे ते अवैध मार्गांचा वापर करून पैसे कमवतात. त्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.

•••••••••••••••••••••••••

■ प्र.  पुढील समस्यांवर उपाय सुचवा :

(१) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.

उत्तर : (१) लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागांची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते.

(२) या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उदयोग स्थापन करणे आणि त्याद्वारा रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.

(३) शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन दयावे. सरकारी मालकीच्या जमिनींवर असे प्रकल्प उभारणे शक्य होईल.

(४) राष्ट्रीकृत आणि सहकारी बँकांच्याद्वारा घरांसाठी रास्त दराने कर्जपुरवठा करण्यात यावा.

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

 ■(१) शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.

उत्तर : (१) आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, ऊर्जाप्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले.

(२) आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली.

(३) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली.

(४) लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला.

(५) ग्रामपंचायतींची जागा नगरपरिषदेने, नगरपरिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या.

(६) अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे.

•••••••••••••••••••••••••

 ■(२) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित नगर.

उत्तर : (१) चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता.

(२) अशा शहरांत निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्यसंस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते.

(३) भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोई- सुविधांची आखणी नगर नियोजनात करण्यात येते.

(४) अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी 'स्मार्ट सिटी' योजना आकाराला आली आहे.

(५) अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास, शिक्षण,आरोग्य, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल.

•••••••••••••••••••••••••

■(३) औदयोगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.

उत्तर  : (१) औदयोगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते. (२) औदयोगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औदयोगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. 

(३) औदयोगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते.

 (४) औदयोगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वांत श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. 

(५) औदयोगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते.

•••••••••••••••••••••••••

■(४) प्रदूषण - एक समस्या.

उत्तर : (१) प्रदूषण (Pollution) या संकल्पनेचा उद्गम इंग्रजी भाषेतील to pollute या शब्दापासून झाला आहे.

(२) To pollute याचा अर्थ दूषित करणे आणि जे घटक वातावरण दूषित करतात, त्यांना प्रदूषके (pollutent) असे म्हणतात.

(३) ही प्रदूषके जमीन, पाणी आणि हवेत मिसळल्याचे भूप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण उद्भवते.

(४) या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यांवर प्रतिकूल परिणाम होत असतो. 

(५) शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे, असे म्हणतात.

(६) प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आपणही व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण

उद्भवू नये यासाठी स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमात सक्रियरीत्या सहभागी होणे अपेक्षित आहे.

•••••••••••••••••••••••••

■ (५) स्वच्छ भारत अभियान.

उत्तर : (१) सन २०१६ मध्ये भारत सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' हा उपक्रम हाती घेतला आहे.

(२) 'एक कदम स्वच्छता की ओर' हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे.

(३) या उपक्रमाचे बोधचिन्ह पुढीलप्रमाणे आहे स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर

(४) सार्वजनिक व खासगी शौचालयांच्या प्रसाराद्वारा खुल्यावर शौचाला जाणे या रूढ पद्धतीला आळा घालण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.

(५) गाव 'हागणदारी मुक्त' व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते.

(६) त्यासाठी लागणारा निधी 'स्वच्छ भारत शुल्क' द्वारा उभारण्यात येतो.

No comments:

Post a Comment