Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 18 July 2023

नववि भूगोल4) बाह्यप्रक्रिया भाग - २

■प्र. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखून लिहा : 

(१) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.

उत्तर : योग्य.

--------------------------

(२) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

उत्तर : अयोग्य. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

-------------------------

(३) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(४) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.

उत्तर : योग्य.

-------------------------

*प्र. ६ पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा :

(१) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

उत्तर : अयोग्य. हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

-------------------------

(२) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयन कार्य घडून येते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(३) नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(४) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

उत्तर : अयोग्य. हिमनदीची गती मध्यभागी जास्त, तर दोन्ही काठांवर कमी असते.

-------------------------

■ प्र. चुकीची जोडी ओळखा :

(१) संचयन - 'V' आकाराची दरी.

(२) वहन – ऊर्मिचिन्हे

(३) खनन - भूछत्र खडक.

उत्तर : संचयन - 'V' आकाराची 

-------------------------

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

*(१) नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

उत्तर : नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे

होत : (१) घळई (२) 'व्ही' (V) आकाराची दरी (३) कुंभगर्त (४) धबधबा.

-------------------------

(२) लवणस्तंभांची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?

उत्तर : (१) लवणस्तंभांची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.

(२) चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभांची निर्मिती होते.

-------------------------

*(३) सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

उत्तर : सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे

पुढीलप्रमाणे होत : (१) पुळण (२) वाळूचा दांडा (३) खाजण.

-------------------------

(४) हिमोढाचे प्रकार कोणते ?

उत्तर : (१) भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ हे हिमोढाचे चार प्रकार होत.

(२) हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोढास भू-हिमोढ म्हणतात.

(३) हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोढास पार्श्व हिमोढ म्हणतात.

(४) जेव्हा दोन हिमनदया एकत्र येतात, तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोढ तयार होतो.

(५) हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोढ पुढेवाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ म्हणतात.

-------------------------

No comments:

Post a Comment