कला प्रेम
ग्रीस देशातील अॅथेन्स शहरात एक क्रियो नावाचा तरुण गुलाम राहत होता. संगमरवरी दगडाच्या सुबक मूर्ती बनवून तो आपला उदरनिर्वाह चालवत असे; परंतु कोणाही गुलामाने कलेची उपासना करायची नाही, असा कायदा पास झाला. क्रियोची त्यामुळे मोठी पंचाईत झाली.आपल्या बहिणीला सांगून तो एका गुहेत गुपचूप राहू लागला व तेथेच तो मूर्ती बनवू लागला. अॅथेन्स शहरात एकदा मूर्तीचे प्रदर्शन भरवण्याचे ठरविले. क्रियोला आशा होती की, अॅथेन्सचा शासनाधिकारी पेरिविलजन आपल्याला पुरस्कार देईल; कारण तो कलाप्रेमी व रसिक आहे. म्हणून त्याने प्रदर्शनात स्वतः न जाता आपल्या बहिणीला पाठविले. तिच्याबरोबर त्याने खूपच सुंदर काही मूर्ती प्रदर्शनात पाठविल्या. त्या मूर्ती प्रेक्षकांच्या फारच पसंतीस आल्या; हे पाहून इतर कलाकार मत्सराने जळू लागले. त्यांनी त्या मूर्ती कोणाच्या आहेत म्हणून विचारले. बहिणीने सांगण्यास नकार दिला. तिला तुरुंगात टाकण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिला. क्रियोला है कळल्यावर तो धावत धावत तेथे आता व सर्व हकीकत सगळ्यांना सांगितली तेव्हा सगळ्या कलाकारांनी त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी केली. 'मात्र कला ही सकलांसाठी आहे. विशिष्ट वर्गाची ती मालकी किंवा मवारी नाही.' एवढे बोलून पेरिक्लिजनने त्याला आपल्याजवळ बसविले. सन्मानाचा मुकुट त्याच्या डोक्यावर क्रिय कलाकौशल्य, तर परिब्लिजनचे कलाप्रेम पाहून नागरिकांची मने हेलावून गेली.
No comments:
Post a Comment