Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 1 June 2021

दुहीचे फळ

                 दुहीचे फळ



एका पारध्याने पक्ष्यांना पकडण्याकरिता एक जाळे पसरले. त्यात दोन पक्षी अडकले; परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास सुरुवात केली. पारध्याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्ष्यांकडे पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या ते दृश्य पाहिले. त्याने पारध्याला जवळ बोलावून विचारले, “तू विनाकारण का पळत आहेस ? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहेत.' पारधी म्हणाला, "आता या पक्ष्यांमध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवून नेऊ शकले; परंतु थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबूर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या अपेक्षा ठेवून धावत आहे. जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्या वेळेस मी त्यांना पकडीन." पारधी म्हणाला, , ते खरे ठरले. थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला व सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची दिशा व पंखांची गती सारखी राहिली नाही. त्यामुळे ते पूर्णपणे जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या वजनाने अडकत ते पण खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणाम असा झाला क़ी जाळ्यासकट ते जमिनीवर पडले. पारध्याने त्यांना सहजपणे पकडले. तात्पर्य : एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो.

No comments:

Post a Comment