निरर्थक शंका
एका बाईचे मन फारच संशयी होते. ज्यांना काहीही आधार नाही, अशा शंका-कुशंका सदैव तिच्या मनात वास करीत. काही वेळेस तर या अकारण काळजीने तिची भूक व झोप पार उडून जायची. एकदा तिला वाटले, आपल्या जीवनात खूप अडचणी, संकटे येणार आहेत. एका मानसशास्त्रज्ञाने तिला सर्व संभाव्य आपत्तींची एक यादी तयार करावयास सांगितली. त्याप्रमाणे तिने ती केली. कोणी भेटायला आलं की, ती त्या अडचणींचा पाढा वाचायची. रडायला लागायची. काही वेळेस तर तिला भीतीने बोलणेही अशक्य होईल. सहा महिन्यांनंतर मानसशास्त्रज्ञाने तिला परत बोलावले. यादीतील किती गोष्टी खरोखर प्रत्यक्षात घडल्या ते विचारले. तेव्हा तिच्या लक्षात आले की, त्यातले खरेच काहीच घडले नव्हते. तिने ती यादी फाडून टाकली. व्यर्थ शंका बाळगून आपण आपले व दुसऱ्याचेही जगणे कसे नीरस करतो, हे तिच्या ध्यानात आले. बहुतेक माणसे अशा रितीने स्वतःच धूळ उडवतात आणि मग दिसत नाही म्हणून त्रागा करीत असतात. संशयांच्या घातक बाणांनी ते स्वतः स्वतःचेच मन जखमी करून घेतात. शंका, चिंता, काळजी यामुळे मोहरीएवढे छोटे संकटदेखील मोठे बनत असते. काळजी घ्यावी, करू नये.
No comments:
Post a Comment