Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 8 May 2021

मुंगी

 


            नीतिमूल्यांच्या जपणुकीमधून आपले व्यक्तिमत्त्व किंवा चारित्र्य प्रतिबिंबित होत असते. या सुंदर जगाचा आपण एक घटक आहोत व या जगात आपण सन्मानाने तसेच प्रतिष्ठेने जगले पाहिजे, हे लक्षात ठेवायला हवे. त्याचबरोबर इतरांच्या प्रतिष्ठेलाही मान दिला | पाहिजे. माणुसकीच्या नात्याने सर्वाशी प्रेमाने व आपुलकीने वागून | आपण आपल्यात नक्कीच सुधारणा करू शकतो. असे म्हणतात की, तुमच्याशी लोकांनी चांगले वागावे, अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्हीही लोकांशी चांगले वागले पाहिजे. जसे आपले कर्म असते तसेच त्याचे फळ मिळते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही एखाद्याला त्याच्या अडचणीत केलेली मदत किंवा दाखविलेली आपुलकी, सहानुभूती तो कधीही विसरणार नाही. ते मुंगीच्या गोष्टीतून आपण समजून घेऊ या. एकदा एक मुंगी नदीत पडली व पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागली. झाडावर बसलेल्या कबुतराने ते पाहिले व तिला मदत करण्यासाठी त्याने झाडाचे एक पान त्या प्रवाहात टाकले. मुंगी कशीबशी त्या पानावर चढली व नदीच्या काठावर आली. आपला जीव वाचवला म्हणून तिने कबुतराचे आभार मानले व त्याला कधी गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासनही दिले. कबुतराला मुंगीचे आश्वासन ऐकून आश्चर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला की, ही लहानशी मुंगी आपली काय मदत करणार? बघू या, ही मुंगी आपल्याला कशी मदत करेल ते? एक दिवस कबूतर निवांतपणे बसले असताना दूरवर एक शिकारी नेम धरून कबुतराला बाण मारण्याच्या तयारीत होता. हे कबुतराला दिसले नाही; पण त्या मुंगीला दिसले. ती लगबगीने तिकडे गेली व तो शिकारी बाण सोडणार एवढ्यात ती त्याला कडकडून चावली. शिकायला वेदना झाली व तो ओरडला. ते ऐकून कबूतर सावध झाले व उडून गेले. उडता उडता कबुतराला कळले, की सत्कृत्य केल्याने त्याचे फळही चांगलेच मिळते.

No comments:

Post a Comment