Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 8 May 2021

संधीचे सोने करायचे असते

          संधीचे सोने करायचे असते 



            एक मच्छिमार होता. समुद्राला भरती येण्यापूर्वी तो त्याचे जाळे किनाऱ्यावर अंथरून ठेवी. भरती येऊन गेल्यावर जाळ्यात अडकलेले मासे घेऊन तो घरी येई. दोन-चार मासे मिळाले, तरी त्याचे समाधान होईना. एके दिवशी भल्या पहाटे उठून तो समुद्रकिनाऱ्यावर गेला. त्याच्या जाळ्यात दोन मासे आणि मूठभर 'खडे' दिसले. माशांबरोबर मूठभर 'खडे' घेऊन जावे, असे त्याला वाटले. पण, लगेचच त्याने विचार बदलला. दगड बरोबर घेऊन जाण्यापेक्षा ते फेकून ओझे कमी करावे, असे त्याने ठरविले. त्याला घरी जायची घाई नव्हती; म्हणून तो किनाऱ्यावर खेळत बसला. जाळ्यातीलएकेक 'खडा' तो पाण्यात फेकून लागला. अशा रीतीने त्याने बराच वेळ घालविला. सूर्य उजाडण्यावेळी तो घरी आला. त्याने ओसरीवर जाळे टाकले आणि तो बाजेवर जाऊन पडला. तेवढ्यात त्याची बायको ओरडली. तिला जाळ्यात काही तरी चमकत असल्याचे दिसले. तो हिरा होता. जाळ्यातून बाहेर काढून तिने तो हिरा नवऱ्याला दाखविला. ते बघताच नवरा अवाक् झाला. त्याने डोक्याला हात लावला. बायको म्हणाली, "अहो, हिरा आहे तो. हिरा बघून कुठे चक्कर येते का?" मच्छिमार रडवेल्या स्वरात म्हणाला, "अगं, मी सकाळी मूठभर हिरे खडे समजून एकेक करीत पाण्यात टाकले. मूठभर हिरे गेले तेथे एका हिऱ्याला काय करू?” बायको हुशार. ती म्हणाली, "अनेक संधी वाया गेल्या म्हणून काय रडत बसायचे का? एक संधी अजून आपल्या हातात आहे. एका हिऱ्यातुन आपण जग निर्माण करू.” ते ऐकून मच्छिमार उठला आणि कामाला लागला. तात्पर्य : संधी नेहमी डोकावत असतात, अनवधानाने काही संधी वाया गेल्या, तरी उरलेल्या संधीचे सोने करायचे असते.

No comments:

Post a Comment