Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 22 March 2021

विल्मा रुडाल्फ

दिनांक १६ मार्च 




सुविचार-

लौकिक पाहिजे असेल तर काहीतरी अलौकिक करून दाखवा.

कथाकथन-

 विल्मा रुडॉल्फ' : विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या चवथ्या वर्षी एकाच वेळी न्युमोनिया आणि लोहितांग ज्वर यांनी तिच्या दोन्ही फुफ्फसांवर हल्ला चढविला. हे दोन्ही आजार एकाच वेळी होण म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. यामुळे पोलिओ होऊन ती पांगळी झाली. आधारासाठी सळई असलेले बूट चालायला ती वापरू लागली, 'तुला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही,' असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली. ती विल्माला म्हणाली. 'देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वास यांच्या आधाराने तू तुला पाहिजे ते हस्तगत करू शकशील.' विल्मा म्हणाली, 'मला जगातील वेगवान धावपटू व्हायचं आहे. वयाच्या नवव्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून तिने आधाराचे बूट काढून टाकले. ती जमिनीवर कधीही पाय टाकू शकणार नाही, असे डॉक्टर म्हणाले होते. पण, तिने पहिले पाऊल टाकलं. वयाच्या तेराव्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. अगदी मागे मागे राहत ती शेवटी आली. पण, ती दुसऱ्या, तिसऱ्या, चवथ्या स्पर्धेत भाग घेतच राहिली. असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली आली. वयाच्या पंधराव्या वर्षी ती टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत गेली. तेथे तिला एड टेंपल नावाचा प्रशिक्षक भेटला. ती त्याला म्हणाली, 'मला जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचे आहे. ' टेंपल म्हणाला, 'तुझी जर तशीच जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही. मी तुला मदत करीन. आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उनमाशी तुमची स्पर्धा असते. ज्युटा हेन नावाच्या धावपटू-बरोबर विल्माची स्पर्धा होती. ज्युटा हेन तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती. सर्वात प्रथम १०० मीटरची शर्यत होती. विल्माने ज्युटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्णपदक मिळवलं. दुसरी शर्यत २०० मीटरची होती. विल्माने ज्युटाला दुसऱ्यांदा हरवलं आणि दुसरं सुवर्णपदक जिंकलं. तिसरी ४०० मीटरची रीलेची शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माची ज्युटाशी गाठ होती. रीलेमध्ये सर्वात वेगवान धावपटू शेवटच्या टप्प्यात धावतो. त्या दोघीही आपापल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या. पहिल्या. तीन धावपटू व्यवस्थित धावल्या आणि त्यांनी बॅटन व्यवस्थित हाताळलं. विल्माच्यावेळी मात्र तिच्या हातून बॅटन खाली पडलं; परंतु दुसऱ्या टोकाला ज्युटाला वेग घेताना पाहिलं आणि तिनं| बॅटन उचललं, अचाट वेगाने यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं ज्युटाला हरवलं. तिसरं सुवर्णपदक पटकावलं, इतिहास घडवला. पोलिओने अपंग झालेली महिला १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली.


दिनविशेष -  प्र.बा.गजेंद्रगडकर जन्मदिन - १९०१ : सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती, विधीवेत्ते व एक श्रेष्ठ विचारवंत जन्म व प्राथमिक शिक्षण सातारा येथे १९१८ मध्ये विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक, उच्चशिक्षण पुण्यास. शैक्षणिक जीवनात अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी म्हणून ते चमकले. सन १९२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरूवात. १९४५ मध्ये ते मुंबई उच्चन्यायालयाचे एक न्यायाधीश झाले आणि १९६४ ते १९६६ अशी दोन वर्षे ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती होते; निवृत्त झाल्यावर ते मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष कुलगुरु होते. विधी | आयोग, मुंबईची एशियाटिक सोसायटी, रामकृष्ण मिशन आश्रम, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. १९७२ साली त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. विचारप्रवर्तक स्वरुपाचे बरेच लेखन त्यांनी केले आहे.


सामान्यज्ञान-

फ्रॅनेरिसा हा प्राणी डोके आणि धड या दोनच भागांचा असतो. डोके व धड यामध्ये तो कापला तर धडाला नवे डोके आणि डोक्याला नवे धड फुटते.

No comments:

Post a Comment