Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 22 March 2021

15 मार्च, संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

दिनांक-१५मार्च





सुविचार

लौकिक पहिजे असेल तर काहीतरी अलौकिक करून दाखवा      

कथाकथन -   

               'आपले  राष्ट्रीय पंचांग '

           : आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या कालगणना प्रचलित होत्या त्यानुसार अनेक पंचांग वापरात होती व आहेत. त्या जुन्या गणितावर आधारलेल्या असल्याने ऋतू चक्राशी, सौरवर्षमानाशी मेळ असणारे एकही पंचांग नव्हते. भारतात सर्वत्र एकच शास्त्रशुध्द पंचाग असावे या हेतूने केंद्र सरकारने नोव्हेंबर १९५२ मध्ये डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक पंचांग सुधारणा समिती स्थापन केली होती. त्या समितीने चांद्रमास, सौरमास आणि प्रत्यक्ष आकाशातील ग्रहांची स्थिती यांचा शास्त्रशुध्द मेळ घालून आदर्श अशा कालगणेनेचे पंचाग सुचविले. ते केंद्र सरकारने मान्य करून २२ मार्च १९५७ पासून भारतीय सौर पंचांग सुरू केले. ही सौर वर्षगणना अशी आहे. १) सूर्य वसत संपातावर ज्या दिवशी येतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्षाचा आरंभ धरावा. २) प्रचलित शालिवाहन वर्षगणना या सौर पंचागासाठी स्विकारावी. ३) चैत्र-वैशाखादी भारतीय महिन्यांची नावे या वर्ष गणनेसाठी द्यावी. फक्त भाद्रपदा ऐवजी 'भाद्र' आणि मार्गशीर्ष ऐवजी 'अग्रहायण अशी नवी दोन नावे असावी. ४) चैत्र या वर्षारंभाच्या महिन्याचा प्रथम दिन २२ मार्च रोजी दरवर्षी असतो. प्लुत (लीप)वर्षी तो २१ मार्च रोजी असतो. ५) प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांचे असेल. त्यात वैशाख ते भाद्र हे ५ महिने ३१-३१ दिवसाचे आणि चैत्र आणि कार्तिक ते फाल्गुन हे ७ महिने ३०-३० दिवसांचे असतील. प्लुत वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस असतील व ते वर्ष ३६६ दिवसांचे असेल. ६) शालिवाहन शकाच्या वर्षगणनेच्या संख्येत ७८ मिळवून त्या संख्येला ४ ने निःशेष भाग जात असेल तर ते प्लुत वर्ष धरले जाईल. तसेच ज्या पूर्ण शतक संख्येत ४०० ने निःशेष भाग जाईल तेच पूर्ण शतक संख्येचे वर्ष प्लुत वर्ष धरण्यात येईल. पूर्ण शतक संख्येला ४०० ने निःशेष भाग जात नसल्यास ते प्लुत वर्ष नसेल. ७) दिवसाचा प्रारंभ मध्यरात्रीपासून मानला जाईल. धार्मिक कार्यात तो सूर्योदयापासून मानावा. ८) उज्जयिनी येथील मध्यरात्रीची वेळ भारतभर प्रमाण मानण्यात येईल. ९) धार्मिक कार्यासाठी चांद्रमास घ्यावे. ज्या सौरमासात शुक्ल प्रतिपदा येईल. त्या सौरमासाचे नाव त्या चांद्रमासाला द्यावे. वेळ सौरमासात दोन शुक्ल प्रतिपदा आल्यास पहिलीचा चांद्रमास हा अधिक मास व दुसरीचा चांद्रमास निजमास धरण्यास येईल. केंद्रसरकारच्या प्रकाशन विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पंचांग केले जाते. परंतु जगात सर्वत्र खिस्ती कालगणनाच मानली जात असल्याने केंद्र सरकारही अजून त्याच कालगणनेचा अवलंब करीत आहे. जेव्हा शासकीय स्तरावर भारतीय सौर कालगणनेचा अवलंब केला जाईल तेव्हाच जनतेतही ते प्रचलित होईल.


दिनविशेष-

दिनविशेष क्रांतिकारी युगप्रवर्तक कांशीरामजी जयंती १९३४ : 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यातनाच्या जाणिवेशी ज्यांची नाळ जुळली गेली ते म्हणजे ब. स. पा. चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कांशीरामजी होत. स्वत:प्रती अत्यंत कर्तव्यकठोर, संघर्षशील स्वभावाचे तसेच आपत्तीजनक स्थितीतून लोकशाहीला सलामत ठेवणारा वळण बिंदू म्हणजेच कांशिरामजी 'समाजाचे मी काही देणे लागतो' ही अहंतारहिर सक्षम जाणीव प्रथमच त्यांनी 'पे बॅक टु दि सोसायटी' या निर्मितीक्षम सुत्राने बामसेफच्या माध्यमातून करून दिली; आणि बुद्धिजीवींना आपल्या नैतिक जबाबदारीसाठी कार्यप्रवण केले. 'जाती तोडो-समाज जोडो हा त्यांचा नुसता नारा नसून लढा होता. त्यांनी सम्राट अशोक व बाबसाहेबांच्या समता संगरात स्वत:ला जीवंत गाडून घेऊन सर्व संघपरित्याग केला. बहुजनांसाठी संघर्ष करणारे कांशीरामजी दि. ९ ऑक्टो. २००६ रोजी अनंतात विलिन होऊन जगभर अजरामर झाले. त्यांच्यानंतर चळवळीची (ब. स. पा)ची धुरा उत्तराधिकारी सुश्री बहेन मायावती यांनी सांभाळली.


सामान्यज्ञान-

• गॅलिलिओने १६१० मध्ये मंगळ या ग्रहाचा शोध लावला. सूर्यापासून आरंभ केल्यास याचा चौथा क्रमांक लागतो. सुर्याची प्रदक्षिणा तो अंडाकृती मार्गाने घालतो. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळास (पृथ्वीवरील) ६८६ दिवस २३.५ तास लागतात. त्याला फोबस व डायमॉस नावाचे दोन चंद्र आहेत.मंगळावरील आवरण लोखंडाच्या ऑक्साईडचे असल्याने लाल दिसतो.


No comments:

Post a Comment