Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 7 March 2021

२६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन

 २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन 





माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला २६ जानेवारीनिमित्त दोन शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकावे... 

आज २६ जानेवारी. आपला प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण काही काही वेळा माझ्या बालमनाला प्रश्न पडतो आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालोय का? आहोत का? सद्य:स्थितीतला माणूस मानवता मूल्य हरवत चाललाय, समाजाची बैठक पुरती कोलमडली आहे आणि म्हणून या मांगल्याच्या दिनी आज मी तुम्हाला माणसातला माणूस कसा शोधावा हे सांगणार आहे. 

घाईगर्दीच्या या जगात माणुसकीची वाढ थांबली आहे. अंतर्मनाचे संस्करण अशक्य झाले आहे. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध जीवनप्रवाहातून बाजूला फेकले जातात. आदर्श गुरुजनांची अवहेलना घडते आहे. संस्कारांचे निशाण डळमळले आहे. 

जातीयता, प्रांतीयता, बलात्कार, खून, दंगल दहशत, असुरक्षितता यांचे शेवाळ जीवन प्रवाहात दाटले आहे. समुद्रात सर्वत्र पाणीच पाणी असावे पण पिण्यासारखे पाणी थेंबभर सुद्धा नसावे तसे मानवयी जीवनाचे झाले आहे. सगळीकडे माणसेच माणसे दिसत आहेत, पण यात माणूस कोठे आहे? असा प्रश्न पडतो प्रत्येक माणसाला माणूसपण यावे हीच अपेक्षा.

जे का रंजले गांजले त्यासि म्हणजे जो आपुले' या संत वचनाप्रमाणे प्रत्येकाने वर्तन करावे. भुकेलेल्यास अत्र द्यावे, तहानलेल्यांना पाणी इतकी साधी साधी सूत्रे जरी प्रत्येक भारतीयाने मनाशी बिंबवली तर हा भारत देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल. इथले कुपोषण, सामाजिक विषमता, भूक, दारिद्र्य नष्ट होईल. यासाठी सामाजिक संस्था, राजकीय स्तर इ. विविध पातळीवर शिखर प्रयत्न व्हावेत तर आणि तरच समता, समानता आणि बंधुता मूल्य रुजेल आण मानवतेचे ध्येय गाठता येईल. 

भारत हा विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. तो जगातील सर्वांत मोठा लोकशाही प्रधान देश आहे. राज्य आणि संघराज्य ही एक प्रशासकीय व राजनैतिक कल्पना आहे. राष्ट्र हा एक इतिहासदत्त सांस्कृतिक आकृतिबंध आहे. आपल्या नैसर्गिक सरहद्दीवरून ओळखला जाणारा भूप्रदेश हाच पायाभूत घटक होय. या भूप्रदेशात बोलली जाणारी भाषा, आचरला जाणारा धर्म, पाळले जाणारे आचार हे राष्ट्राच्या प्रकृतीतील अन्य घटक होत. खरे तर लोक जीवनात अविर्भूत होणारी अस्मिता राष्ट्राच्या जन्म जाणिवेतून घडते' राष्ट्र हे प्रथम मनात जन्माला येते मग भूतलावर त्याचे प्रकटीकरण घडते. असा भारत घडावा हीच अपेक्षा.... जय हिंद!

No comments:

Post a Comment