Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 14 March 2021

झाडाचे बीज कुठे असते?

           'झाडाचे बीज कुठे असते? 



                : अकबर बादशहाची बिरबलावर फारच मर्जी होती. सर्व बादशहाचे जुने मंत्री मात्र या गोष्टीवर फार नाराज होते. कारण हा त्यांचा अपमानच होता. कामे त्याला विचारूनच बादशहा करायचा. एक दिवस बादशहा जेव्हा दरबारात आला तेव्हा सगळेजण गप्प बसले होते. त्यावेळी दरबारात बिरबल हजर नव्हता. बादशहाला त्या मौनव्रताचे कारण समजले नाही. वेगवेगळे विषय काढून त्याने दरबारी लोकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही.

            शेवटी बादशहाने त्यांना मौनव्रताचे कारण विचारले. तेव्हा एका वृध्द दरबारी व्यक्तिने नम्रतेने सांगितले की, 'सरकार, आज खूप वर्षे झाली आम्ही तुमच्याच अन्नावर जगतोय आणि आमचं काम आम्ही इमानदारीने करतो आहोत. पण, पण, आमची तुम्ही एवढीसुध्दा फिकीर करीत नाही आणि या काल आलेल्या बिरबलाकडून सर्व समस्या सोडवून घेता. असं का?' त्यावर बादशहा म्हणाला, 'बर, आज आता चांगली सधी आहे. बिरबलपण दरबारात नाही. आता एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची आहे की, झाडाचं बीज कुठे असतं?' थोडा वेळ विचारमंथन झाले. पण, कुणालाच बरोबर उत्तर देता आले नाही. 'बघा!' बादशहा म्हणाला, 'तुम्हाला आता उत्तर देता येत नाही. मग आता मला त्या हुशार माणसाला विचारणं भागच आहे ! जर तुमच्यात ती योग्यता असती तर मला त्याची गरज पडली नसती. 

             बघा आता आपल्या समोरच मी हा प्रश्न बिरबलाला विचारतो. बघू तो काय उत्तर देतो ते?' बादशहाने एका नोकराला पाठवून बिरबलाला बोलावून घेतलं. बिरबल आल्यावर बादशहाने त्याला तोच प्रश्न विचारला. बिरबलाने लगेच एका नोकराला पाणी आणायला सांगितले. पाणी आणल्यावर बिरबलाने ते जमिनीवर शिपंडले आणि सांगितले. 'इथे झाडाचे बीज आहे.' दरबारी लोक आश्चर्यचकित झाले. पण, याचा अर्थ मात्र थोड्याच्याच लक्षात आला. सगळे आपले एकमेकांच्या तोंडाकडे बघतच राहिले. बादशहा काय समजायचे ते समजला आणि तो बिरबलाला म्हणाला, "याचा अर्थ सांग बर काय तो?' 

             बिरबल म्हणाला, 'सरकार, सगळ्या झाडाचं बीज | या पृथ्वीवरच आहे. त्याला केवळ पाण्याचीच आवश्यकता आहे. पाणी पडताच ते उगवते. जिथे पाणी पडले तिथे झाडाचे बीज आहे असे समजावे. सगळे दरबारी हे ऐकून बिरबलाच्या बुध्दीची प्रशंसा करू लागले. मग मात्र सर्व दरबारी गप्प बसले. बादशहाही या उत्तरावर खुष झाला आणि त्याने बिरबलाला बक्षीस देऊन त्याचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment