Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 6 March 2021

बोधकथा-शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

                'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' 



एक वाघ फसून पिंजऱ्यात अडकला बाहेर निघण्याकरिता त्याने पुष्कळ धडपड केली; पण व्यर्थ, तेव्हा तो निराश होऊन स्वस्थ बसला इतक्यात रस्त्याने एक मनुष्य चालला होता त्याला त्या वाघाने हाक मारली आणि तो केविलवाणे तोंंड करून म्हणाला, महाराज मला सोडवता का? मनुष्य नको रे बाबा, बाहेर आल्यावर तू मला खाशील, वाघ 'नाही हो! मी बिलकूल खाणार नाही तुम्हाला स्पर्शसुध्दा करणार नाही. मला सोडवाल तर मी आपल्याला एक सोन्याच कड बक्षीस देईन मनुष्य खरच देशील का? असे म्हणून त्याने वाघाला मोकळे केले बाहेर आल्यावर मनुष्य त्याच्याजवळ कडे मागू लागला तेव्हा वाघ गुरकावून म्हणतो, कसल कड़? थांब तुला आता मी खातो मनुष्य नको रे भाऊ मला कड़ नको देऊस वाटेल तर पण मला जिवंत सोड मी तुझ्या पाया पडतो, वाघ- खाणार खाणार, मनुष्य खाणार तर खा बाबा पण वाघोबा माझी एक विनंती ऐकून घ्यावी, वाघ काय विनंती?' चल, बोल लवकर मला भूक लागलीय ! मनुष्य विनंती इतकीच की, आपण दोघेही वाटेने जाऊ जाता जाता क्रमाने जे तिघेजण प्रथम भेटतील, न्या तिघानीही जर खा' असा निकाल दिला. तर आपण मला खुशाल खावे. 

      वाघ 'ठीक आहे. चल तर असे म्हणून दोघेही वाट चालू लागले पहिल्याने त्याना एक झाड भेटले त्याला मनुष्याने घडलेली सर्व हकीकत सांंगितल्यावर वाघोबाने निकाल विचारला., तेव्हा झाड म्हणाले, ही माणस फार दुष्ट आहेत माझ्या थंडगार छायेत बसून ही विसावा घेतात आणि सरपणाची गरज लागल्यावर तीच माणस माझ्यावर निर्दयपणे कुह्रड चालवितात. याना उपकाराची बिलकूल जाणीव नाही. उपकार करणाऱ्यावरही सापासारखी उलटून उपकाराची फेड अपकाराने करतात. असली ही कृतघ्न माणस आहेत. त्यातलाच हा एक आहे. तेव्हा याला तू बेलाशक खा झाडाने असा निकाल दिल्यावर मनुष्याचे तोड खरकन उतरले. ते दोघे थोडे पुढे गेल्यावर त्याना एक गाय भेटली. तिला माणसाने सर्व हकिकत सांगितली आणि मग वाघोबाने निकाल विचारला. तेव्हा गाय म्हणाली, ही माणस अति नीच आहेत माझ दूध माझ्या पोरापुरतच देवान दिलेल असत. तेही मध्येच्या मध्येच खातात आणि माझ्या वासराना उपाशी मारतात शिवाय माझ्या वासरापैकी जे बैल असतात, त्यानाही नांंगराला जुपून त्याचा अतिशय छळ करतात. तेव्हा या माणसाला तू खाच' हा निकाल ऐकल्यावर माणसाचे धाब दणाणले, पण वाघोबाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ते दोघे आणखी पुढे चालू लागले. माणसाला भीती पडली की, 'आता तिसर्याने सुध्दा जर खा' असाच निकाल दिला तर मग आपली  शंंभर खास भरलीच आणि वाघ मनात माडेखात चालला होता की, आता तिसराही'खा' असाच निकाल देणार कारण इजा, बिजा नि तीजा' इतक्यात त्याना एक कोल्हा भेटला. त्याला वाघाने सर्व हकीकत सांगितली आणि निकाल विचारला तेव्हा कोल्हा म्हणाला, 'महाराज, मी आताच निकाल देत नाही. आपण कोणत्या पिंजऱ्यात अडकला होता, तो पिंजरा कृपा करून दाखवाल कार्य वाघ हो, हो! काय हरकत आहे? चल दाखवतो असे म्हणून ते तिघेही माघारी फिरले आणि पिंजऱ्यापाशी आले तेव्हा वाघ म्हणाला, हा पहा तो पिंजरा कोल्हा अस का? बर या माणसाला सोन्याच कड़ देण्याच तुम्ही कबूल केल होत काय? वाघ होय' कोल्हा ठीक ते नका देऊ वाटेल तर! पण तुम्ही या पिंज-यात कसे अडकला होता, हे मला पाहिले पाहिजे ते बघून जर माझी खात्री पटली तर मी खा' असा निकाल देईन वाघ हा पहा मी असा अडकलो होतो' असे म्हणून तो पिंजऱ्यात शिरला, तो चटकन माणसाने दार लावून त्याला कुलूप ठोकले तेव्हा कोल्हा म्हणतो, काय वाघोबा, तू या माणसाला खाणार होतास, नाही का आता खा बघू या धूर्त कोल्ह्याने आपणास चांगलेच चकविले, असे पाहून वाघोबा रागान हातपाय आपटीत व जिभल्या चाटीत तेथेच स्वस्थ बसले.

No comments:

Post a Comment