Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 3 March 2021

कथाकथन- विद्येचा उपयोग

                   'विद्येचा उपयोग ' 



          एके काळी बोधिसत्व मृगकुळामध्ये जन्मला होता. तो मृगविद्येत अत्यंत निपुण होता. त्याला दोन बहिणी होत्या. त्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या दोन मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी बोधिसत्वाकडे पाठविले. पण, त्यापैकी खारदिया नावाच्या बहिणीचा मुलगा बोधिसत्वानं त्याला बोलावलं तरी त्याच्याजवळ आला नाही. मग बोधिसत्वानं त्याचा नाद सोडून दिला. पण, दुसऱ्या बहिणीचा मुलगा त्रिपल्लत्थ हा मामानं नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे. खारदियेचा मुलगा अभ्यासाच्या वेळी अरण्यात उनाडक्या करत भटकत असे.

             एके दिवशी पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला. घाबरून तो मोठमोठ्यानं ओरडू लागला. त्याच्या आईने त्याची ही अवस्था पाहिली. ती धावतच बोधिसत्वाकडे आली नि म्हणाली, 'दादा, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या बाळाची सुटका कर, तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'खारदिया, तुझ्या मुलाला मी अनेकदा वेळेवर येण्यास सांगूनही तो माझ्याकडे आला नाही. त्याला उगाचंच इकडे तिकडे भटकण्याची, खोड्या करण्याची सवय लागली. आता पाशात अडकल्यावर त्याला सोडवायला जाण्यात काहीच अर्थ नाही. मी जर तिथे गेलो तर तो पारधी त्यांच्याबरोबर मलाही ठार मारेल.' खारदियाला वाईट वाटलं. ती रडत-रडत मुलाला समजावयाला गेली, पण तिला मुलगा दिसलाच नाही. पारध्यानं त्याला केव्हाच मारून नेलं होतं. काही काळानंतर त्रिपल्लत्थ नेमका त्याच पारध्याच्या जाळ्यात सापडला. तेव्हा त्याची आईही बोधिसत्वाकडे येऊन म्हणाली, 'दादा, मी तुझ्या मुलाला तुझ्याजवळ विद्या शिकायला ठेवलं.पण, आज तो संकटात आहे. काहीही कर. पण, त्याला सोडव.' तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'तू काही काळजी करू नकोस. तो सर्व विद्या शिकला आहे. तो सर्व संकटातून स्वतःची सुटका करेल.' 

          इकडे तो पारधी येण्यापूर्वी त्रिपल्लत्थने आपले पोट फुगवलं डोळे वटारून नि हातपाय ताणून मेल्याचं सोंग घेतलं. थोड्या वेळानं पारधी येऊन पाहतो तो याच्या तोंडातून फेस आलेला. त्यानं याच्या पोटावर दोन-तीन टिचक्या मारल्या. त्याला वाटलं हा मेला. त्याचं मांस लौकर शिजवलं पाहिजे. नाही तर सर्व श्रम वाया जातील म्हणून त्यानं त्याच्या भोवतीचं जाळं काढून घेतलं. मग मांस काढण्यासाठी तो सुरी साफ करू लागला. तोच त्रिपल्लत्थ उठला. नि वेगानं पळत सुटला. त्याला पाहून त्याच्या आईला खूप आनंद झाला.

No comments:

Post a Comment