Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 11 March 2021

आज लोकमान्य टिळक असते तर

 आज लोकमान्य टिळक असते तर...



 माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, धर्म रक्षणार्थ परमेश्वर खरोखर अवतरतो की नाही माहीत नाही, पण जेव्हा जेव्हा समाजात अराजक माजतं, अन्यायाचं पारडं जड होतं तेव्हा तेव्हा महापुरुषांनी समाजाला तारलं आहे. मार्गदर्शन केलं आहे, एक दिशा दिली आहे. 

लोकमान्य टिळक असेच एक महापुरुष होते. त्यांनी इंग्रजांच्या जुलुमानं गलितगात्र झालेल्या समाजात चैतन्य निर्माण केलं. अन्यायाचा प्रतिकार करण्याची समाजाला ताकद दिली म्हणूनच त्याकाळी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी फासावरही जाणारी तरुण पिढी इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. 

आज संजय दत्तसारखे तरुण आमच्या तरुणांचे हीरो आहेत. समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे जहाल नेते आज नाहीत. म्हणूनच संयोजकांनी 'लोकमान्य टिळक आज असते तर...' असा विषय देऊन लोकमान्य टिळकांसारख्या जहाल नेत्याची समाजाला गरज आहे, याची जाणीव करून दिली आहे. 

लोकमान्य टिळकांच्या या देशात लोकमान्यांच्या विचारांची राखरांगोळी झाली आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी टिळक प्राणपणाने लढले, त्या स्वातंत्र्यातील राजकारण, शिक्षण आणि समाजजीवन भ्रष्टाचारानं लडबडून गेलं आहे. 

पप्पू कॉलनी, हितेंद्र ठाकूरसारखी गुंड आणि भ्रष्ट माणसं राजरोसपणे राज्य करीत आहेत. आपण सारे भाऊभाऊ, सगळे मिळून सगळंच खाऊ, या न्यायाने मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सगळेच हात धुवून येत आहेत. इकडे देशावरच कर्ज आणि दारिद्रय वाढतच आहे.

 शिक्षणातील भ्रष्टाचार विद्यार्थी आणि विद्यापीठं हातात हात घालून, परे जात आहेत. 

टिळक आज असते तर त्यांनी अर्धी शक्ती भ्रष्टाचार निपटून काढण्यात खर्च केली असती.

 टिळक हाडाचे शिक्षक होते. युवकांच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी युवकांना हाताशी धरलं असतं. आपली धारदार लेखणी, जहाल वाणी, प्रखर बुद्धिमत्ता आणि कर्तव्याची आंतरिक तळमळ या भांडवलावर त्यांनी युवकांमध्ये देशभक्तीची ज्योत जागवत ठेवली असती.

 युवकांचे आरोग्य आणि चारित्र्य यांवर टिळकांनी अधिक भर दिला असता. त्यासाठी त्यांनी पालकांचे आणि शिक्षकांचे वारंवार प्रबोधन केले असते.

 शिवजयंती आणि गणेशोत्सवात त्यांना आजच्यासारखा धांगडधिंगा अपेक्षित नव्हता.

 टिळक असते, तर 'त्यापेक्षा बंद करा हे उत्सव' असे नक्कीच कडाडले असते. 

मायकेल जॅक्सन, संजय दत्त, गोविंदा अशा हीरोंचे माकडचाळे पाहण्यात आयुष्य वाया घालवण्याऱ्या तरुणांची शक्ती टिळकांनी भ्रष्टाचारनिर्मूलनाकडे वळविली असती. त्यासाठी देशभर दौरे करून, कडव्या निष्ठावंत तरुणांची भ्रष्टाचारविरोधी संघटना उभी केली असती. युवकांना जागं करण्यासाठी त्यांच्या वाणीइतकीच त्यांची लेखणीही तळपली असती.

 भ्रष्टाचाराबद्दल लिहिताना "या देशातील तरुण झोपले आहेत का?" असे लेख लिहून, त्यांनी तरुणांना जागतं ठेवलं असतं. 

बोगस मतदान असो, बोफोर्स तोफा खरेदीप्रकरण असो, हर्षद मेहता भ्रष्टाचार प्रकरण असो... टिळकांनी ते दडपू दिलं नसतं. "राज्य करणे म्हणजे भ्रष्टाचार दडपणे नव्हे," असे जळजळीत लेख लिहून, सरकारला फटकारलं असतं.

शहाबानो प्रकरणात त्यांनी मुस्लिम स्त्रियांना न्याय मिळवून दिला असता. टिळक असते तर आजपर्यंत काश्मीरचं भिजतघोंगड पडलं नसतं. आपलं काश्मीर आज आपल्या पायाखाली राहिलं असतं. दाऊद इब्राहिम टोळीचे आज भारतात जे लाड चालू आहेत, ते तसे लाड टिळकांनी चालू दिले नसते. 

थोडक्यात आजची तरुण पिढी सरकार आणि संपत्ती जी भ्रष्टाचाराच्या भस्मासुरात भस्म होत आहे, त्याला टिळक असते तर आजही लागली नसती. 

त्यांनी पुन:श्च हरिओम म्हणून नुसते अग्रलेखच लिहिले नसते, तर सामाजिक पुनरुज्जीवनाची त्यांनी चळवळ उभी केली असती आणि या मरगळलेल्या गलितगात्र झालेल्या समाजाला हाक देत, त्या नरकेसरीने गर्जना केली असती. 

जय हिंद!

No comments:

Post a Comment