Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 14 March 2021

बोधकथा-संत तुकाराम

               'संत तुकाराम'- 



संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे बालपण आई-वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली अतिशय मजेत गेले रगाने सावळा असलेला तुका दिसायला अतिशय देखणा होता. तेज:पुंज होता. आईचा अतिशय लाडका होता. इंद्रायणीच्या डोहात डुबायला त्याला खूप आवडायचे. मुलांबरोबर तो खूप खेळायचा. तुकारामाच्या बोलण्यात एका प्रकारचे लाघवीपण होते. दिवसभर हुदडणारा तुका उन्हे उतरायला लागली की, मग मात्र आईच्या भोवतीभोवती फिरत राहायचा. आई छोट्या तुक्याला संत ज्ञानेश्वरांची आणि संत नामदेवांची गोष्ट सांगायची, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचून दाखवायची, नामदेव महाराजाचे सहज सोपे अभंग पाठ करुन घ्यायची. रात्र कोंदाटू लागली की तुका आईच्या कुशीत झोपायचा. झोपताना मात्र आई खूप वेळेला नामदेवासंबंधी सांगायची. म्हणायची, "बरे का तुका' आपला हा नामदेव तुझ्यासारखा छोटा असताना, पढरपुरातल्या आपल्या घरासमोरच्या विठ्ठल मंदिरात नैवेद्याचे ताट घेऊन जायचा आणि साक्षात श्रीविठ्ठलाला घास भरवायचा. श्रीविठ्ठला बरोबर संवाद करायचा. त्याने खूप सुंदर अभंग लिहिले. तुकारामा, माझी इच्छा आहे की तू सुद्धा नामदेवासारखा विठ्ठलभक्त हो अभंग लिही. 

             नामदेवाने ठरविले होते की, शतकोटी अभंग लिहिन म्हणून. त्याने विठ्ठलासमोर तशी प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा आता तू पूर्ण कर...' कनकाई म्हणजे तुकारामाची आई छोट्या तुकोबावर संत नामदेवांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे संस्कार करायची. छोट्या तुकारामाला रोज अभंग पाठ करायला लावायची. त्याचा परिणाम असा झाला की, छोटा तुका पहाटे उठून, इंद्रायणीच्या डोहात स्वच्छ आघोळ करुन, विठ्ठल मंदिरात जाऊ लागला आणि नामदेव महाराजांचे अभंग अतिशय गोड आवाजात म्हणू लागला. 

         कनकाई रोज पहाटे छोट्या तुकाबरोबर देवळात जायची तुकारामावर त्यांच्या आईने अप्रतिम संस्कार केले. हळूहळू तुकाराम तरुण होऊ लागला. स्वतःच अभग रचू लागला. तेव्हा कनकाईला खूप आनद व्हायचा. तुकाराम महाराजांचे अभंग लोकांच्या जिभेवर आहेत. हे संत तुकोबाराय छत्रपती शिवरायांचे गुरु होत.

         मुलांनो या गोष्टीवरुन ध्यानात घ्यायची गोष्ट काय तर तुकाराम महाराजांसारखी आपण सुद्धा आईची इच्छा पूर्ण करावी. आपल्या प्रिय आईला आपल्या कर्तृत्वाचा आनंद उपभोगायला

No comments:

Post a Comment