Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 30 September 2023

दहावी मराठी ८. वाट पाहतना

दहावी मराठी  ८. वाट पाहतना



कृती १ : (आकलन कृती)  

• आकृत्या पूर्ण करा : 

 (i) होळीनंतर वातावरणात होणारा बदल. 

 - थंडी झपाट्याने कमी कमी होत जायची.

 - आंब्याच्या झाडावर मोहोराचा घमघमाट पसरायचा.

------------------------------------------------------------------

  (ii) लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी . 

  - अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड  

   - सकाळी सकाळी शनिवारवाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले 

   - माठातले वाळा घातलेले पाणी

   - आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई

   - अंगणभर पसरलेली वाळवणे

   - कैरीची डाळ आणि पन्हे

---------------------------------------------------------------------

 (iii)  पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या  गोष्टी

  - न पाहिलेले देश

  - न पाहिलेली माणसे

   - न अनुभवलेले प्रसंग

    - न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी

--------------------------------------------------------------------

(iv) लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी 

- कोकिळाचा कुहुकुहु आवाज

- परीक्षेनंतरची सुट्टी

 - गोष्टी-कवितांची पुस्तके

 - उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा

  - कविता.

---------------------------------------------------------

  कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

    (१) म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.

  उत्तर : तसे पाहिले तर पत्रांनी भरलेला अवजड थैला घेऊन वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या-वस्त्यांमध्ये तंगडतोड करीत जाणे हे खूप कष्टाचे काम होते. एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी, त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा-आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते. मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई- वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे; तरच मानवी समाजाला भविष्य आहे.

------------------------------------------------------------

 (२) 'वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे,' या विधानाची सत्यता पटवून दया.

   उत्तर : 'वाट पाहताना' या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुखमंत्रच सांगितला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी पाहायला शिकले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. मन शंकेने व्याकुळ होते. हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का? असा प्रश्न मनात काहूर माजवतो. 

          एखादी गोष्ट वाट न पाहता, चटकन मिळाली, तर ती गोष्ट आपली जिवाभावाची आहे की वरवरची आहे, हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल, हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे, हे कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे, हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे, हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते, हे खरे आहे.

---------------------------------------------------------

No comments:

Post a Comment