यशाचा मंत्र
"तिच्या औषधासाठी आमच्याजवळ काहीच पैसे नाहीत.” त्या मुलाने आपली कहाणी सांगितली. "म्हणजे तुला मदत हवी आहे. किती पैशांची गरज आहे?” "मला अशी फुकट मदत नको आहे. मी एक कविता लिहिली आहे. ती कविता आपण आपल्या मैफलीत गावी. त्यानंतर आपल्याला योग्य वाटेल तर मला थोडे साहाय्य करावे, अशी माझी नम्र व कळकळीची विनंती आहे."त्याच्या अशा बोलण्याने श्रीमती मेलिब्रान खूपच प्रभावित झाल्या. दुसऱ्या दिवशी संगीत सभेत त्यांनी भरभरून मदत केली. मेलिब्रान ते सर्व पैसे घेऊन पियरेबरोबर त्याच्या आईकडे आली व म्हणाली, "या सर्व पैशांवर पियरेचा हक्क आहे. त्याचे मातृप्रेम, स्वाभिमान व प्रतिमा अद्वितीय आहे. मला अभिमान वाटतो की, आपण अशा मुलांच्या आई आहात !"
No comments:
Post a Comment