Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 5 June 2021

चार भाग

                     चार भाग 



एक राजा जंगलातून चालला होता. त्याने एका शेतात एका तरुणाला नांगर चालविताना पाहिले. हा तरुण आपल्याच धुंदीत मस्तपैकी गाणे गात नांगर हाकलत होता. राजा क्षणभर तेथे थांवला. त्या तरुणाची ती प्रसन्नता पाहून व मधुर आवाज ऐकून राजाने त्याला विचारले, “तू तर भलताच खुशीत दिसत आहेस, रोज किती पैसे कमावतोस?" तरुणाने हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिले, 'रोज मी अंगमेहनत करून आठ आणे कमावतो व चार प्रकारे त्याचा समान खर्च करतो. मला यापेक्षा अधिक मिळविण्याची व अधिक खर्च करण्याची मुळीच लालसा नाही. त्यामुळे मला कसलीच काळजी नाही.' ." "कशा चार प्रकारे तु तुझ्या पैशांचा उपयोग करतोस?" राजाने विचारले. त्या तरुणाने पैशाची समान वाटणी कशी केली जाते, ते राजाला स्पष्ट केले, “आईवडिलांनी माझे पालनपोषण केले. त्यांचे ऋण आजन्म आहे. त्यांच्यासाठी दोन आणे खर्च करून ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. मुले-बाळे मोठी झाल्यावर माझी सेवा करतील. त्यांच्यासाठी दोन आणे खर्च करतो. जणू हे माझे त्यांना दिलेले एक प्रकारचे कर्जच समजा. मी शेतकरी आहे. माणूस जे पेरतो ते उगवते. दुसऱ्याला प्रथम काहीतरी दिल्याशिवाय स्वतःला कधी काही मिळत नाही. म्हणून मी उरलेल्या चार आण्यांपैकी दोन आण्यांचे दान करतो. सर्व करून जे दोन आणे उरतात, त्यात माझे पोट भरतो.” कष्टाची कमाई व तिचे सुयोग्य नियोजन आणि विनियोग यामुळे जीवन कसे सुखी व आनंदी बनते, याचे यथार्थ दर्शन त्या दिवशी राजाला झाले.

No comments:

Post a Comment