स्वागत व निरोप
भोजराजाचा दरबार भरलेला होता, राजा सिंहासनावर बसल होता. इतक्यात एका व्यक्तीले राजसभेत प्रवेश केला, तिथे कपड़े फारच सुंदर व किंमती होते. राजाने स्वतः उढून त्याचे स्वागत केले. थोड्या वेळाने दुसरा एक माणूस आला. त्याचे कपडे फारच साथै व जुने होते. राजाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. तो खाली जमिनीवर बसला. थोड्या वेळाने दरबारात चर्चा व वादविवाद सुरू झाला. त्या जीर्ण-शीर्ण कपडे घातलेल्या माणसाच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलत असल्याचा भास होत होता. त्या उलट भारी पोशाख घातलेला विद्वान फारसा बोलत नव्हता, तो बोलत होता, त्यातही काही दम नव्हता. दरबार बरखास्त झाला तेव्हा राजा साव हलके कपडे घातलेल्या माणसाला दारापर्यंत निरोप द्यायला गेला. याउलट भारी पोशाख घातलेल्या माणसाकडे त्याने दुकूनही पाहिले नाही. दरबारातील सर्व सदस्यांना राजाच्या या वागण्याचे आश्चर्य वाटले, नंतर एका जिज्ञासूने विचारले, "महाराज, पहिल्यांदा आपण ज्या माणसाचे स्वतः उठून स्वागत केले. त्याच्याकडे जाताना पाहिलेसुद्धा नाही; परंतु ज्याच्याकडे सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष केलेत; त्याला मात्र जातीने निरोप दिलात. त्याच्याशी गप्पा मारल्यात, असे घडण्याचे कारण काय?" राजा म्हणाला, “जेव्हा माणूस येतो तेव्हा आपण त्याचा पोशाख पाहतो, त्याच्या बाह्यरुपाचा आपल्यावर प्रभाव पडतो; परंतु निरोप देताना त्या व्यक्तीची विद्वत्ता, तिचे गुण आपण पाहतो. मी पहिल्यांदा पोशाखाचं स्वागत केले, आणि दुसऱ्या वेळेस गुणाचे स्वागत केलं. मनुष्याची विद्वत्ता, सभ्यता व चातुर्य त्याच्या बोलण्यातून प्रकट होत असते. विद्वत्तापूर्ण वाणी हाच माणसाचा खरा अलंकार आहे. ".
No comments:
Post a Comment