Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday, 23 March 2021

संस्कारमोती (सुविचार, बोधकथा,दिनविशेष, सामान्यज्ञान)

१८ मार्च- संस्कारमोती



सुविचार -

 प्रबोधन, परिश्रम, संघटन आणि संघर्ष ही परिवर्तनाची वाट आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कथाकथन-

 - कोणी श्रीमंत तर कोणी गरीब का?' : एक दिवस बादशहाने विचारले की, 'या जगात कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे अस का? सगळे लोक म्हणतात की, ईश्वर सर्व जगात श्रेष्ठ आहे. या जगातील सर्वजण त्याची लेकरे आहेत. पण वडील जशी आपल्या मुलाची खूप काळजी घेतात तसा ईश्वर आपल्या लेकरांची का काळजी घेत नाही. कुणाजवळ पुष्कळ पैसा असतो; तर कुणाकडे रोजची पोट भरायची भ्रांत असते. यावर बिरबल म्हणाला, 'सरकार, असं जर ईश्वराने नाही केलं तर चालणार नाही. आता बघा, तुम्ही राजे आहात. एका दृष्टीने तुम्हीही प्रजेचे पिता आहात. तर आपण सगळ्यांकडून खूप काम करवून घेऊन कुणाला हजार, कुणाला पाचशे, कुणाला पन्नास, तर कुणाला फक्त पाच सात मोहराच महिन्याला देता. मग असं का? सगळ्यांना का नाही सारखे देत?' बादशहा यावर काहीच उत्तर देऊ शकला नाही. उलट विचार करू लागला. तेव्हा बिरबलच त्यांना म्हणाला, 'जो जस काम करतो तशीच मजुरी त्याला मिळते. आणि याच न्यायावर दुनियेचा व्यवहार चालतो. जर असं झालं नाही तर सृष्टी चालणारच नाही आणि अगदी असाच न्याय ईश्वरही करतो. या जगातले लोक दुःखी व्हावेत असं त्याला कधीच वाटत नाही. मनुष्याचे दुःखापासून रक्षण करतो. परंतु जर कोणी सृष्टीचे नियम मोडले तर त्या गुन्ह्याची त्याला शिक्षा होतेच. हा न्याय आहे ईश्वराचा ! बाकी सर्व खोटं आहे. कुणाला जास्त पैसा मिळतो, कुणाला कमी मिळतो. हे त्याच्या कष्टावर अवलंबून आहे. जो प्रामाणिकपणे जास्तीतजास्त कष्ट करेल त्याला खूप पैसा मिळेल. तो श्रीमंत होईल. जो कष्ट करणार नाही तो दरिद्री होईल किंवा राहील.' बादशहा या विश्लेषणावर खूप संतुष्ट झाला.


 दिनविशेष

 शहाजी राजे भोसले जन्मदिन-१५९४ : शहाजी राजे भोसले यांचा जन्म १५९४ मध्ये झाला. मालोजी बाबाजी भोसले है त्यांचे वडील. आपल्या शूरपणाने व कर्तबगारीने त्यांनी प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून मोठा नावलौकिक मिळविला. ते स्वतंत्र व बाणेदार वृत्तीचे होते. संस्कृत विद्येचे अभिमानी, ललित कलांचे भोक्ते आणि कर्नाटकातल्या हिंदू राजांचे त्राते म्हणून त्यांनी मिळविलेला लौकिक आजही टिकून आहे. स्वराज्य स्थापनेची त्यांना तळमळ होती. परंतु परिस्थितीपुढे त्यांचा नाईलाज होता. इतिहासकारांनी त्यांना 'स्वराज्य संकल्पक' ही पदवी दिली आहे. शहाजी राजांनी १६४१ मध्ये शिवाजीला जिजाबाई समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर सांभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. वयाच्या १२व्या वर्षापासून शिवाजी महाराज जहागिरीचा कारभार पाहू लागले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापना केल्याने शहाजी महाराजांच्या मनातील तळमळच सार्थकी लागली. २३ जानेवारी १६६४ मध्ये शहाजी राजांचे अपघाती निधन झाले.


सामान्यज्ञान 

नेहमीच्या वापरातील धातूत सोने जास्त जड आहे. पाऱ्यात ते तरंगते. घर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटेच्या आकाराएवढी सोन्याची वीट बनविली तर ती सुमारे ३२ किलो वजनाची भरले.


No comments:

Post a Comment