Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 4 March 2021

सदृढ शरीर हाच खरा अलंकार-निबंध

          सदृढ शरीर हाच खरा अलंकार



             लोकमान्य टिळक यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट माझ्या मनावर विशेष जास्तप्रमाणात ठसली. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षी त्यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचे ठरवले. तसा निश्चयपूर्वक प्रयत्न केला व सुदृढ शरीर मिळवले. या सुद्ध शरीराचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी काळात खूप झाला. 

           सुदृढ शरीराचे महत्त्व पुराणकाळापासूनच मान्य केले गेले आहे. त्या काळात माणूस हा सतत निसर्गाच्या सहवासात राहत होता. यंत्रांचा शोध लागलेला नसल्यामुळे तो स्वावलंबी जीवन जगत होता. कष्टात असे त्याचे जीवन होते. रामायणकाळातील मारुतो हो पराक्रमाची, शरीरसुदृढतेची प्रतीक अशी देवता होती. बलोपासना हीच मारुतीची उपासना आहे ! 

           समर्थ रामदासांनी तरुणांना याच शक्ति-उपासनेचा मार्ग दाखवला. रामदास सांगतात - "शक्तिने पावती सुखे। शक्ति नसता विटंबना।। शक्तिने नेटका प्राणी। वैभव भोगता दिसे॥" 

        शरीर सुदृढ नसेल; तर व्यक्तीच्या विद्वत्तेचा वा ज्ञानाचा त्याला किंवा समाजाला काही उपयोग होत नाही. गोपाळ गणेश आगरकर यांना तरुण वयापासून दम्याचा आजार होता. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभू शकले नाही. माधवराव पेशवे यांना उत्तम आरोग्य लाभले असते, तर कदाचित पेशवाईचा इतिहास बदलला असता. विदेशात जाऊन वैदयकीय पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी किंवा तरुण वयात गणितात चमत्कार घडवणारे रामानुजन यांना । उत्तम आरोग्य लाभले असते, तर ते भारताचे भाग्यविधाते ठरले असते.सदा शरीरसंपत्ती ही धनसंपत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण धनसंपत्ती पुन:पुन्हा संपादन करता येते, पण शारीरिक संपदा ढासळली तर परत मिळवणे फार जिकिरीचे. म्हणून व्यायाम करण्याची आवड़ लहानपणापासूनच लागायला हवी. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्' हे सुभाषित सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. शरीररूपी संपत्ती आपली आपल्यालाच मिळवावी लागते आणि प्राप्त केलेली ही संपत्ती प्रयत्नाने टिकवावी ही लागते. 

          शरीरसंपदा उत्तम असेल, तर आयुर्वृद्धी, बलवृद्धी होतेच; शिवाय मनाचेही सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली व्यक्तीच जीवनातील कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकते आणि सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास्तव्य करत असते. स्वामी विवेकानंद तरुणांना सांगत, 'खचलेली शरीरे व पिचलेली मनगटे असलेल्या तरुणांच्या हातून काहीच होणार नाही.' आज विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आयुर्मर्यादा वाढवली आहे. पण निरोगी आरोग्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेतच; कारण शेवटी सुदृढ शरीर हाच खरा अलंकार आहे !

No comments:

Post a Comment