Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 27 March 2021

संस्कारमोती 28 मार्च -

 28 मार्च



सुविचार -

  अग्नीने सोन्याची परीक्षा होते आणि शुराची विपत्तीने


कथाकथन - शिवाजी महाराज 

   उष:काल होण्यापूर्वी  अंंधार पसरावा तसे झाले होते यवनांंनी लढाया, जाळपोळ लुटा लूट करून सारा महाराष्ट्र होरपळून टाकला होता यवनांची नजर पडताच आकाशात विहार करणारे पक्षीसुध्दा खाली पडायचे त्यांच्या तोफांच्या आगीने जमीन भाजून निघत होती. सर्वत्र गलितगात्र वातावरण भासत होते अशा या अंंधाऱ्या वातावरणात शिवनेरी किल्ल्यावरून बालकाच्या रडण्याचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यात पुन्हा पुन्हा घुमू लागला या रडण्याच्या आवाजात कारूण्य नव्हते तर, उष:कालची हास्य लकेर होती इतकी वर्षे गलितगात्र झालेल्या वातावरणात चैतन्य निर्माण झाले. आकाशातील सार ग्रह, तारे हा आवाज ऐकण्यासाठी सज्ज झाले. जिजाबाईच्या उदरी, शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १९३० रोजी पुत्र जन्माला आला. बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणूनच बाळाचे नाव शिवा ठेवले तरी सर्वजण कौतुकाने शिवबा म्हणूनच हाक मारीत. हा शिवबा शिवनेरी वर चंद्रकलेपमाणे वाढत होता पुण्यातील लाल महालात रामायण, महाभारत, राजनीति, शास्त्रे यात तो रममाण होई शिवबाचा जन्म मुजरा करण्यासाठी झाला नाही, हे शहाजीराजांनी अगोदरच ओळखले होते. त्या आनंद वाटत होता. भोसले नाव महाराष्ट्रातून पुसून टाकण्यासाठी मुस्तफाखानाने आणि बाजी घोरपड्यानी चंग बांधला होता. त्यांनी दगाफटका करुन शहाजीराजाना पकडले. छावणीचे नुकसान केले शहाजीराजे पकडले गेले हे कळताच राजगड सुन्न झाला, परतु येणारी दुःखे ही भविष्यात चांगले घडावे म्हणून सुध्दा येतात अस म्हणतात ते इथही प्रत्ययास आल शिवराय या प्रसगाने न डगमगता युध्दाला सामोरे गेले व अफाट शक्तीच्या मुस्तफाखानाचा पराभव केला. शहाजीराजाच्या सुटकेसाठी शिवाजीनी वापरलेली मुत्सद्देगिरी अवर्णनीय अशी होती. शके १५८१ ला अफजलखानाला युक्तीने ठार मारले आणि महाराजांच्या विजयाची घौडदौड चालूच राहिली. त्यानी महाराष्ट्रातील सर्व भागात हिंडवून डोंगर, दऱ्या, किल्ले आदिंची माहिती करून घेतली. वयाच्या १६ वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिकला. या किल्ल्याची डागडुजी करीत असता त्यास द्रव्यांचा हंडा सापडला. त्या द्रव्याने त्यांनी राजगड किल्ला बांंधला. पुढे शिवरायांनी पुणे परगणा हस्तगत करून चाकण, कोंडाणा व पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले. जगाच्या इतिहासात अनेक मुत्सद्दी, वीर योध्दे झाले परतु शिवाजी महाराजांसारखा नीतिमान, मुत्सद्दी, वीर पुरूष क्वचितच पहावयास, ऐकावयास मिळेल. जय जिजाऊ.


दिनविशेष 

फ्रेंच, अंध शिक्षक व बेल लिपीचे जनक ब्रेल लुई यांचा स्मृतिदिन (१८५२) ब्रेल लुई हे फ्रेच अध शिक्षक असून त्याचा - . जन्म पॅरिसमध्ये झाला. तीन वर्षाचे असताना दुर्दैवाने त्याच्या डोळ्यास इजा झाली. या दुखापतीमुळे त्यांना अंधत्व आले. दैवाला बोल न लावता ब्रेल लुई परिस्थितीला समोरे जात प्रयत्न करीत राहिले. अंध असूनही स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी विज्ञान आणि संगीत या विषयात विशेष प्राविण्य संपादन केले. १८२४ साली त्यांनी अंधांसाठी उपयुक्त अशी एक वेगळी लिपी तयार केली. तीच ब्रेल लिपी म्हणून सर्वमान्य झाली. या लिपीच्या रूपाने अंधांना वरदान लाभले. उठावदार अशा सहा टिंबांवर आधारलेली अशी ही ब्रेल लिपी आहे. अंध व्यक्ती बोटांनी स्पर्श करून ही टिंबांची लिपी वाचतात. हेलन केलरला अॅन सुलीव्हन या शिक्षिकेने क्रेलच्या मदतीनेच शिकविले.



सामान्यज्ञान - • घार, गिधाडे व बहिरी ससाणा यांची दृष्टी तीक्ष्ण आणि अतिदूरपर्यंत चालणारी असते. त्यांना २/३ कि.मी. उंंचीवरुन खाली जमिनीवर वळवळणारे लहान किडे, अळ्या दिस शकतात. ०आपल्या शरीराचे तापमान ९८.४ फॅरनहाईट किंवा ३७ सेल्सियस इतके असते.

No comments:

Post a Comment