Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 26 March 2021

संस्कारमोती 27 मार्च ( सुविचार, बोधकथा, दिनविशेष, सामान्यज्ञान)

दिनांक 27 मार्च


सुविचार
-

 आई म्हणजे चंदनाची शीतलता, आई म्हणजे आकाशाची विशालता, आई म्हणजे सागराची अथाग 


    कथाकथन

 - आईचे आशीर्वाद - 


एका गरीब बाईला तीन मुले होती राम आनद अणि सदानद मोलमजुरी करून, भाजीपाला विकान तो दीचा संसार चालवायची. मुले तिला घरकामात मदत करायची बाजारातून सामान आणून द्यायची भाडी चासून द्यायची कपडे धुवायची, के- ा काढायची ही अनेक लहान- मोठी कामे करायची घरात सर्वांनीच एकमेकाना मदत केली की कामे हलकी होतात, वरात सुख शाती राहते. एकदा आईने रामला बोलावते दहा रूपयाची नोट दिली व वाण्याकडून पाव लिटर तेल आणायला सागितले राम वाण्याकडे गेला बाटलीत तेल किन घेतले व घराकडे निघाला थोडासा धादरट होता भराभर चालत निघाला रस्त्यात दगडावर ठेचकाळलाच पडला सारेच लेल जमिनीवर साडले बाटली फुटली तो रडतच धरी आला आई समजली, रामाच्या जीवनात वनवास आहे म्हणून आनंदाला तिने दहा रूपयाची नोट दिली व পजारातून तेल आणायला सागितले तो दुकानात गेला बाटलीत तेल भरून घेतले रस्त्यातून सावधपणे चालू लागला तरीहो बाजारातील गीत एका अनामिकाचा धक्का लागला बाटली हातातून निसटण्यापूर्वीच तोल सावरला तरी बाटलीतले अर्ध तेल साडले पण बाटली वाचली अयं तेल बाटलीत राहिले. त्याने आईला वाटेत घडलेली हकीगत सांगितली व म्हणाला, मी अर्धे तेल व सपूर्ण बाटली वाचविली आहे आईला अर्ध तेल को होते. पुरे पाव लिटरच तेल हवे होते आई समजली, हा ससारात सुख-द खे भोगेल प्रण समाधानात राहील सदानदाला तिने बाजारात पाठविले. दहा रूपयाची नोट दिली तिला पुरे पाव लिटरच तेल हवे हेते व त्याची कामाची पद्धतही पाहयची होती सदानंद खरोखरच सदानंदी होता पण त्याच्या बाबतीतही तोच प्रकार घडला अर्ध तेल घेऊन आला तोही आनंदाप्रमाणेच पडला होता पण रामाप्रमाणे निराश झाला नाही किंवा अर्धे तेल वाचविल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला नाही. तो म्हणाला "आई तुला पूर्ण बाटली पाव लिटर तेलाने भरून हवी आहे ना? मी देतो. हे पैसे शिल्लक आहेत तेही तुझ्याकडेच ठेव मी बाजारात जातो काही काम करून पैसे मिळवितो आणि तुला पूर्ण पाव लिटर तेलच आणून देतो थोडा वेळ थाबशील ना? सहनशीलता हा गुण आईला कुणी शिकवावा लागत नाही आई मनात म्हणाली, 'हा मुलगा निराशावादी नाही आणि आशावादीही नाही. निरपेक्ष कर्मयोगी आहे वास्तववादी आहे. सत्याचे भान याला आहे जीवनातील वास्तवता - सत्यदर्शन ज्याला घडते, तो स्वतः तर सुखी राहतोच पण इतराचेही सुख पाहतो "मेहनती माणसाला कधीच काही कमी पडत नाही." आई सदानंदाला म्हणाली निसर्गाने सर्व मानवजात समानच निर्माण केली पण काहींना काही गुण अधिक दिले तर काहींना सारखे गुण पण कमी जास्त प्रमाणात दिले इतर प्राण्यापेक्षा मानवाला विवेकशीलता मात्र अधिक दिली त्यामुळे श्रेष्ठ-कनिष्ठता गुणाप्रमाणे ठरू लागली. काही स्वत लाच श्रेष्ठ समजू लागले काहींच्यावर लोकाकडून श्रेष्ठता लादली गेली तर काही निसर्गदत्त गुणानीच श्रेष्ठ ठरले ज्ञानेश्वर, भगवान येश, संत तुकाराम, कबीर, शंकराचार्य, विवेकानंद अशी माणसे जन्मत: च निसर्गाची देणगी घेऊन आली सिंकदर, सम्राट चंद्रगुप्त, फ्रेडरिक द ग्रेट, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण इ. नी आपल्या मेहनतीने, गुणसंपदेने, विवेकशीलतेने श्रेष्ठता संपादन केली. पण रावण, कस, कुंंभकर्ण, दुर्योधन, तैमूरलग, नादीरशाह यासारखे स्वत: लाच श्रेष्ठ म्हणवून घेत असतात. कोणत्याही परिस्थितीत माणसाच्या मनाचा समतोल बिघडता कामा नये म्हणून 'सदानद, तू जीवनात सदासुखी राहणार आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत. आईने प्रेमाने सदानंदच्या पाठीवरून हात फिरविला व त्याला जवळ घेतले.


 दिनविशेष 

अंंतराळवीर युरी गागारीन स्मृतिदिन (१९६८) अतरिक्षयानातून पृथ्वीभोवती पहिली फेरी मारणारे रशियन अतराळवीर म्हणून युरी गांगारीन याचे नाव इतिहासात सन्मानाने नोंदविले गेले. १२ एप्रिल १९६१ रोजी या साहसी वीराने आपले साहसी उड्डाण करून जगाला थक्क करून सोडले. विज्ञानात रशिया जगात पुढे गेला तो गागारीन यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच. मार्च १९३४ मध्ये एका सामान्य कुटुबात सुताराचा मुलगा म्हणून युरी जन्माला आला. औद्योगिक महाविद्यायातील शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर १९५७ मध्ये आरेन्वर्य येथील एव्हिएशन अँकॅडमीत त्यांनी पदवी संपादली. त्यानतर अतरिक्ष यानातून जवळजवळ १०८ मिनिटे ते अतराळसचार करीत राहिले. सोव्हिएट वीर म्हणून सन्मानित झालेले हे युगप्रवर्तक ठरले. अतराळयानाच्या चाचणीत निमग्न असलेल्या या निधड्या छातीच्या साहसी वीराचे २७ मार्च १९६८ रोजी अवघ्या ३४ व्या वर्षी अपघाती निधन झाले.


सामान्यज्ञान -

 आतापर्यंतच्या अंंतराळ मोहिमामध्ये रशियाने व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा अणि स्वेतलाना सावेत्स्काया या दोन महिलाना पाठविले होते. त्या काही काळ अंतराळात राहिल्या होत्या. 


 परागकण धुळीच्या कणासारखे सूक्ष्म आकारमानाचे असतात. त्याच्यात बरीच विविधता असते सूर्यफूलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल तर गुलाबाचे त्रिकोणी असतात. चौरस, अर्धगोल आदि आकाराचे परागकणही आढळतात.


No comments:

Post a Comment