Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 25 March 2021

संस्कारमोती -26 मार्च( सुविचार, बोधकथा, दिनविशेष, सामान्यज्ञान)

दिनांक- 26 मार्च



सुविचार

• लोभ हा पापांचा परमेश्वर आहे. → 


कथाकथन

                     लोभी राजा

- एक मिडास नावाचा लोभी राजा होता त्याच्या जवळ खूप सोनं होत अणि त्याला अधिक सोनंं मिळे तितकी त्याला अधिक हाव सुटे. त्याने सगळ सोनं आपल्या खजिन्यात ठेवल होत. आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत असे. एक दिवस एक अपरिचित व्यक्ती तेथे आली आणि त्याला म्हणाली, तुला काय पाहिजे ते माग' राजा आनंदान म्हणाला, 'मी ज्याला स्पर्श करीन त्याच सोनं होऊ दे. 'नक्की तुला हेच हवं ना?' राजाने उत्तर दिल, राजाने उत्तर दिलं, 'होय' ती व्यक्ती म्हणाली, 'उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणावरोबर तुला ही सिद्धी प्राप्त होईल तू ज्याला हात लावशील ती वस्तु सोन्याची होईल. राजाला वाटल हे काही खर नसाव, आपण बहुधा स्वप्न पहात असणार. दुसऱ्या दिवशी त्याने उठल्याबरोबर पलंगाला, आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्याच सोन्यात रूपांतर झालं. त्याने खिडकीत्न बाहेर पाहिलं. त्याची मुलगी बागेत खेळत होती, त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकीत करायच ठरवलं. त्यामुळे तिला आनंद होईल असे त्याला वाटलं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायचं ठरवल. त्याने पुस्तकाला स्पर्श केला तर ते पुस्तक सोन्याचे झालं. तो न्याहारी करण्यासाठी गेला. त्याने ज्या फळाना, भांड्यांना स्पर्श केला त्या वस्तू सोन्याच्या बनल्या त्याला भूक लागली होती. तो स्वतःशीच म्हणाला, 'मी काही सोनं खाऊ - पिऊ शकत नाही त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली. त्याने तिला जवळं घेतले तर तिचं ही सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर झालं. राजाच्या चेहर्यावरचा आनंद आता मावळला. राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तेथे आली अणि मिळालेल्या वरदानामुळे राजा आनंदात आहे ना, असं तिने विचारलं. राजा म्हणाला, मी तर सर्वात दुःखी माणूस आहे. त्या अपरिचित व्यक्तीने विचारलं, 'तुला काय हवंय? अन्न आणि तुझी लाडकी मुलगी, का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीचा सोन्याचा पुतळा?' राजा क्षमा मागून म्हणाला, 'मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा करून मला माझी मुलगी परत दे, कारण या सगळ्या सोन्यापेक्षाही माझी मुलगी मला मोलाची आहे. तिच्या पुढे या सगळ्या सोन्याची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, 'आता तू शहाणा झालास.' त्या व्यक्तिने दिलेला वर परत घेतला. राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली. त्याला असा धडा मिळाला, जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरला नाही.


दिनविशेष

• उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमातून किल्लोस्करवाडीचा जन्म : १९१० घुळवडीच्या दिवशी पुणे-मिरज मार्गावर कुंडल रोड या आडवळणी स्टेशनवर लक्ष्मणराव किर्लोस्कर आपल्या सहकार्यासह उतरले. त्या उजाड माळरानावा कारखाना व वसाहत उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्करांनी जिद्दीने श्रमून छोटा मांडव उभारला आणि किलोस्करवाडीच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. लक्ष्मणराव बेळगावच्या ठळकवाडीत लोखंडी अवजारांचा स्वावलबी उद्योग करीत होते. जागेची अडचण होती. पण, औंध संस्थानचे नूतन अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या आधारामुळे कुडलजवळची ओसाड जागा त्यांना मिळाली. जिद्दी लक्ष्मणरावानी अथक परिश्रमातून या ठिकाणी जणू नंदनवन उभे केले. कुंडल रोड हे नाव जाऊन तिथे किर्लोस्करवाडी हे नाव झळकले.


→सामान्यज्ञान

 कस्तुरीचा सुगंध शेकडो वर्षे टिकतो. कस्तुरी औषधी आहे. एक पौंड कस्तूरीची किंमत आतरराष्ट्रीय बाजारात हजारों डलि मोजली जाते. • मज्जासंस्था व स्नायू याच्या विकृतीमध्ये स्नायूच्या क्रियाशीलतेत बिघाड उत्पन्न होऊन ते लुळे व दुर्बल पडतात यालाच पक्षाघात झाला असे म्हणतात. क्रियाशीलता काही अशी शिल्लक असल्यास अश पक्षाघात झाला असे म्हणतात.

No comments:

Post a Comment