Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 29 August 2022

शिक्षकदिन 5 सप्टेंबर

 



शिक्षक म्हणजे एक समुद्र.......

                 ज्ञानाचा, पावित्र्याचा, 
                एक आदरणीय कोपरा,
              प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......

शिक्षक:- अपूर्णाला पूर्ण करणारा......
शिक्षक:- शब्दांनी ज्ञान वाढविणारा
शिक्षक:- जगण्यातुन जीवन घडवणारा
शिक्षक:- तत्त्वातुन मुल्ये फुलवणारा...

माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्यादित ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरूवर्यास शतशः नमन.......
मित्रांनो,

           "शिकवता शिकविता आपणास
                  आकाशाला गवसणी
               घालण्याचे सामर्थ्य देणारे
             आदराचे स्थान म्हणजे आपले......."
                         शिक्षक

५ सप्टेंबर... म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर... माझ्या वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडविले... त्या तमाम शिक्षकरूपी
देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो.

                "चिखलातला जन्मही
                 सुंदर सार्थकी लावावा,
                 निसर्गासारखा शिक्षक
                  प्रत्येकाला मिळावा. "

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान
व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत
असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त
करण्याचा हा दिवस.
                असं म्हणतात की,
                        एक पुस्तक,
                        ए एक पेन,
                       एक विद्यार्थी,
                   आणि एक शिक्षक,
               हे संपूर्ण जग बदलू शकतात.....

शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा,कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साथ,तर कधी कौतुकांचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.

शिक्षक म्हणजे,
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती,
चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार,
जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार.

शिक्षक म्हणजे,
सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार,
दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,
अन्यायाविरुध्द आवाज उठविणारी तलवार,
अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार,
असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार.

No comments:

Post a Comment