Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 9 February 2022

Punctuation marks विरामचिन्हांचा उपयोग

 


                           Punctuation marks विरामचिन्हांचा उपयोग


विरामचिन्हांना इंग्रजीमध्ये Punctuation marks असे म्हणतात. विरामचिन्हांचा उपयोग चांगले शुध्दलेखन आणि वाचन करताना त्यांचा अर्थ निट समजण्यासाठी होतो. विरामचिन्हांमुळे एक वाक्य पुर्ण होऊन दुसरे वाक्य कोठून सुरु होते ते समजते. बोलणाऱ्या व्यक्तीच्या आवाजाचा चढ-उतार कसा करावा. कोठे व किती थांबावे हे समजते म्हणून व्याकरणामध्ये विरामचिन्हे यांना फार महत्व आहे. एखादे विरामचिन्ह भलत्या ठिकाणी ठेवल्यास वाक्याचा अर्थ बदलू शकतो.. उदा: ("मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. ") वाक्यातील स्वल्पविराम चूकीच्या ठिकाणी ठेवल्यास वाक्याचा अर्थ कसा बदलतो ते खालीलप्रमाणे पहा. ("मी चोरी करणार, नाही केल्यास शिक्षा करावी")
1) Full Stop पूर्ण विराम ( . ) विधानार्थी, आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी तसेच शब्दांचे संक्षिप्तीकरण करताना पुर्णविराम चिन्हांचा वापर करतात. उदा: She is a girl., Put it down., Stand up., B.A., B.Com., M.A., S.S.C., H.M.

2) Comma स्वल्प विराम (,)
A) yes किंवा no या शब्दानंतर स्वल्पविराम वापरतात. उदा: Yes, he is a good boy No., she is not a clever girl B) अवतरण चिन्ह देण्यापुर्वी स्वल्पविराम देऊन पुढे अवतरण चिन्हातील भाग लिहीतात. उदा: Padar said to Geeta, "Where did you get the money?"
c) एका जातीचे अनेक शब्द (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण) लागोपाठ आल्यास प्रत्येक नावानंतर किंवा शब्दानंतर स्वल्प विराम वापरतात. आणि शेवटचे दोन शब्द and ने जोडतात.
उदा: 1. Padar brought milk coffee, tea. and bread. 2. Madhu, Padar, Sachin and Rahul went to the school,
(D) क्वेशन टॅग देताना क्वेश्चन टॅगच्या अलीकडे स्वल्पविराम देतात. उदा: 1. Lata could sing, couldn'the? 2. Padar brought some land, didn't he? 


3) Colon अपुर्ण विराम (: ) अपुर्ण विराम हा अर्धविरामापेक्षा अधिक काळ पण पुर्णविरामापेक्षा कमी काळ थांबण्यासाठी वापरतात तसेच वाक्यातील उदाहरण तपशील आणि स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात. उदा: The Teacher brought many things for school Pens, balls, bats, books, notebooks etc. 


4) Semi Colon अर्ध विराम ( ;) वाचक स्वल्प विरामाच्या ठिकाणी जेवढा वेळ थांबतो त्यापेक्षा अधिक वेळ अर्ध विरामाच्या ठिकाणी थांबतो. सामान्यतः दोन Co ordinate clause च्यामध्ये अर्धविराम ठेवतात. उदा: 1) He returned house, he sat thinking over it. | 2) He is nervous; there fore he is guilty 


5) Question Mark प्रश्नचिन्ह (?) एखाद्याला सरळ प्रश्न विचारला असेल, तर त्यानंतर प्रश्नचिन्ह घ्यावे. उदा: 1) What are you doing? 2) Where are you going? मात्र अप्रत्यक्ष प्रश्नानंतर प्रश्नचिन्ह देऊ नये. उदा: 1) He asked me where I was going. 2) He asked me what the time was.
6) Exclamation Mark उद्गारचिन्ह (!) उ आनंद, दुःख, आश्चर्य, भिती व्यक्त करण्यासाठी आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. fic ve 1 उदा: 1) What a beautifull flower it is! 2) Hellow ! How are you? 3) Hurrah! we won the cricket match.

7) Dash आडवी लांब रेघ (-) 

A) जेव्हा वाक्याच्या मध्येच अचानक बदल, वेगळे वळण किंवा खंड पडलेला असतो हे दाखविण्यासाठी Dash चिन्हाचा वापर करतात. उदा: 1 Afzalkhan was killed by shivaji the mouse of the mountains had killed the tiger of Bijapur B) दोन अंकाच्या मधील गाळलेल्या सलग अंका ऐवजी Dash चा वापर करतात. उदा: He waited there from 9.40 11.40

8) Hypen आडवी छोटी रेघ (-) 

A) एका ओळीत अपुर्ण राहिलेला शब्द पुढील ओळीत पूर्ण करण्यासाठी संयोग चिन्ह किंवा लहान रेघेचा उपयोग करतात. उदा: 1. I am perfectly capable of manag ing my house. 2) Brother-in-low. 3) Up-to-date news.

9) Apostrophe गलिताक्षारे चिन्ह

(1) काही अक्षरे गाळलेली आहेत हे दाखविण्यासाठी आणि नामाची षष्टी विभक्ती दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. उदा: 1. It is Kedar's Notebook. 2. Do not-don't 3) Can not-can't 4) He will-he'll 5) I have-I've

10) Inverted Comma अवतरण चिन्ह ( " " ) 

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे प्रत्यक्ष संभाषण, उद्गार जसेच्या तसे दर्शविण्यासाठी अवतरण चिन्हाचा उपयोग करतात.
उदाः 1. They said, "What a beautiful flowers" 2) Padar said to Madhu "I am very happy" 


11) Slash पर्यायवाचक चिन्ह (/) 

A) दिनांक / तारीख, अपुर्णांक किंवा संक्षिप्त रुपे दर्शवितांना पर्याय वाचक चिन्ह वापरतात. उदा: 1.21/10/2016 (दिनांक) 2) 3/5, 1/4, 2/5, 1/5 (अपूर्णांक) (B) पर्यायवाचक म्हणजे दोहोंपैकी कोणतेही एक. त्यामध्ये शब्द, वाक्ये, पोटवाक्य वगैरे येतात. उदा: My father/mother/sister will be at home. | 


12) Caret- काकपद (^)

 लिहितांना वाक्यातील एखादा शब्द चूकून | लिहावयाचा विसरला आणि वाक्य लिहून पूर्ण झाले असेल तर राहिलेला शब्द ज्या ठिकाणी लिहायवयाचा आहे. त्या ठिकाणी Caret (^) हे चिन्ह ठेवून वरील बाजूस विसरलेला शब्द लिहीतात. save उदाः 1) Padar was able to Aa rupee every day. fort 2) Shivai was born at the ^ of Shivneri 


13) Capital Mark- मोठी अक्षरे
 

(A) इंग्रजीमध्ये वाक्याच्या सुरुवातीला पहिले | अक्षर Capital लिहितात. तसेच विशेष नामाचे ) पहिले अक्षर Capital लिहितात.

 उदा: 1) Padar is a good boy.

 (2) Heis my frient. 

 3) India, M. Gandhi, Rahul, Patil

B) नद्या, स्थळ, पर्वत, व्यक्ती, शहरे, वार, महिना, देवी, देवता, पुस्तके, ग्रंथ. उत्सव या सर्वांच्या सुरुवातीचे अक्षर Capital म्हणतात. 

 उदाः Mumbai, The Ganga, India, Diwali, Monday, June, The Gita, The Ramayana. 

(C) I हे सर्वनाम म्हणून वापरतांना Capital | लिहितात. 

उदाः 1) I am going to home. 

2) May I come in, Sir?

No comments:

Post a Comment