Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 11 January 2022

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

 उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

 


दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. मी कथा व कादंबरी वाचतो.


हा  स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही.


मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही.


आम्ही  चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो.


उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.


समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.


असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये


अ ) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये


अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाते त्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


यांचे पुढील 4 प्रकार पडतात.


1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय


दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा.  व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय,


2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय


जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की, किंवा, ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.


 


3. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय –


जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी, ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.


 


4. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय –


जेव्हा दोन वाक्यांना जोडणार्‍या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणार्‍या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.


 

 आ ) असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :


उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक मुख्य वाक्य व गौण वाक्य असते, म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिले दुसर्‍या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


यांचे पुढील 4 प्रकार पडतात.


1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय –


उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.


 

2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय


जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.


चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो पुण्याला  गेला.


चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.


विजितेपद मिळावे यावस्त त्यांनी खूप प्रयत्न केले.


3. करणबोधक उभयान्वयी अव्यय


जेव्हा कारण, व, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारण बोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात.


उदा. कारण, का, की इत्यादी.


4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय –


जेव्हा मुख्य गौण वाक्ये जर-तर किंवा जरी-तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जाऊन तायातून संकेत व्यक्त होत असेल त्या अव्यवयांना संकेत बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.


उदा. जर-तर, जारी-तरी, म्हणजे, की, तर


जर दळण आणल तर स्वयंपाक होईल.


नोकरी मिळविली म्हणजे गाडी घेऊन देईल.


तू घरी आला की, आपण सिनेमाला जाऊ

No comments:

Post a Comment