Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 19 June 2021

गुणग्राही बना

                गुणग्राही बना !


 

डॉक्टर जॉन्सन यांनी खूप परिश्रम घेऊन एक शब्दकोश लिहून काढला. या शब्दकोशाची सर्व विद्वानांनी, साहित्यिकांनी, अनुवादकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. एकदा डॉ. जॉन्सन यांना अर्थ महान जय-सावित्री भेटावयास त्यांच्या घरी एक महिला आली. गप्पा मारता मारता ती म्हणाली, “तुमचा कोश मला आवडला नाही. त्याच्या संदर्भात माझी एक तक्रार आहे." "कोणती तक्रार आहे?" डॉ. जॉन्सन यांनी शांतपणे विचारले. त्या बाई म्हणाल्या, “कोशात काही अश्लील व वाईट शब्द आहेत. ते कोशातून काढून टाकाल तर चांगले होईल." डॉ. जॉन्सन यांनी त्यावर उत्तर दिले, "आपण माझा कोश वाचलात म्हणून मी आपणास धन्यवाद देतो; परंतु आपले लक्ष नेमके त्या अभद्र शब्दांकडेच का गेले, हे मला जाणून घ्यावयाचे आहे. कोशात इतर हजारो चांगले शब्द आहेत; त्याकडे आपले लक्ष का नाही गेले?” त्या महिलेने उत्तर न देता अपराधी भावनेने मान खाली घातली. दुसन्याचे दोष आपल्याला चटकन दिसतात. त्याच्या गुणांकडे मात्र लक्ष जात नाही. जशी ज्याची दृष्टी असते, तशी सृष्टी त्याला दिसते. मनुष्याने छिद्रान्वेषी न होता गुणग्राही बनले पाहिजे.

No comments:

Post a Comment