Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 9 March 2021

स्वतंत्र भारताचा भविष्यकाळ कसा असेल?

 स्वतंत्र भारताचा भविष्यकाळ कसा असेल?


 

             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, व्यासपीठावरील मान्ववर आणि माझ्या स्पर्धक मित्रांनो, 'स्वतंत्र भारताचा भविष्यकाळ कसा असेल?' या विषयावर मी बोलणार आहे. 

              दूरदर्शनवरील जाहिराती पाहून कोणालाही असं वाटेल, की आजच्या तरुणांसमोर मुख्य प्रश्न आहे, तो कोक प्यायचा की पेप्सी हा आणि मुख्य समस्या आहे ती केसातील कोंडा कसा काढायचा हीच. आजच्या तरुण पिढीबद्दल आपले अनेक गैरसमज आहेत. तरुण पिढी बेजबाबदार आहे, आमच्या काळी असं नव्हतं, आजच्या तरुणांसमोर आदर्श नाहीत. असं काही सुरू झालं, की समजावं; बोलणयांचं वय झालेलं आहे. आपल्या आजच्या अनेक प्रश्नांमुळे भविष्यकाळ अगदी काळाकुट्ट आहे असं म्हणणाऱ्या पांढरपेशी समाजाला मला असं सांगायचं आहे की, एक तर आपले प्रश्न जगावेगळे नाहीत. दुसरं असं, की समाजात जे काही परिवर्तन घडतं ते मूठभर ध्येयवेड्या तरुणांमुळेच. पायाखाली निखारे आणि हातात पेटत्या मशाली घेऊन निघालेल्या मूठभर ध्येयवादी तरुणांनीच भयाण अंधकारातून स्वातंत्र्याची वाट धुंडाळली. आजही मळलेल्या वाटा सोडून, स्वत: धुंडाळेल्या परिवर्तनवादी वाटांवरून जाणारे कितीतरी प्रतिभावान ध्येयवादी तरुण आपल्या आहेत. प्रसिद्धिमाध्यमांच कॅमेरे, नेते आणि अभिनेते यांच्याभोवतीच फिरत असल्यामुळे आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. अविनाश धर्माधिकारीसारखे जागृत तरुण IAS अधिकारी आणि पत्रकार .

          भ्रष्ट मंत्र्यांच्या मनमानीला झुगारून, परिवर्तनाच्या चळवळीत उतरले आहेत आपल्या देशातील सामान्य तरुण गरीब, कष्टाळू, होतकरू आणि राष्ट्रावर नितांत प्रेम करणारा आहे. आयआयटी, आयुका, टीआयएफ अशा जागतिक कीर्तीच्या इन्स्टिट्यूटसाठी निवडल्या जाणाऱ्या तरुणांमध्ये ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेले तरुण अधिक आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानावर इतरांच्या तुलनेत आपला खर्च कमी होत असूनही आपण PSLV चं यशस्वी लाँचिंग केलं. यामागे असलेले तंत्रज्ञात आणि विज्ञान भारताने स्वत: मिळवलेलं आहे. आपला शैक्षणिक दर्जा जगात फारसा चांगला नसूनही आपली वैज्ञानिक मनुष्यशक्ती जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे, असं प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं मत आहे. आपली संरक्षणव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे. शंभर कोटी लोकांचा बोजा पाठीवर असूनही आपण 'अग्नि'सारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या भारतीय बुद्धिमत्तेचा भारताकडे उलटा प्रवास सुरू आहे. याचे महत्त्वाचे कारण भारताची आगामी अर्थव्यवस्था ही स्पर्धात्मक कौशल्यावर आधारित असेल. येणारे युग हे बौद्धिक भांडवल, माहिती व तंत्रज्ञानाचे युग असेल. स्पर्धात्मक गुणवत्ता हा येणाऱ्या भविष्याचा युगधर्म असेल, असे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे सल्लागार डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि गॅट कराराच्या अपरिहार्य आगमनाने कृषी आणि औद्योगिक विकासाबरोबरच अपरिहार्यपणे उत्पादनाचा गुणवत्ता वाढणार आहे. याचा फायदा म्हणून भार जागतिक बादरापेठेतील दुसरे हाँगकाँग होणार आहे. हे मी कल्पतेच्या राज्यात जाऊन बोलत नाही, तर सध्याच्या गृहीतकांवरून तज्ज्ञांनी मांडलेलं हे गणित आहे. 

      भारताकडे नैसर्गिक संपत्ती, बौद्धिक संपत्ती आणि मनुष्यबळाच्या रूपाने प्रचंड क्षमता आहे. ही सगळी क्षमता जर वापरली, तर भविष्यकाळात भारत आशिया खंडातील महासत्ता म्हणून जगात चीनच्या बरोबरीने ऊभा राहणार आहे. शेवटी मी एवढंच म्हणेत- 'पूर्व द्या ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ.'

No comments:

Post a Comment