Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 22 March 2021

जिंकण ही एक घटना आहे

 


जिंकणं ही तर एक घटना आहे, जेता असणं ही मनोवृत्ती आहे. 

: मॅरेथॉनमध्ये शेकडो माणसे धावत होते. त्यात तीन माणसे वेगवेगळ्या उद्देशाने सामील झाली होती. त्यांचे नंबर आले नाहीत. पण, ते खुश होते. का? पहिल्याला आपली क्षमता अजमाबून पहायची होती. आणि त्याच्या अपेक्षेपेक्षाही उत्तम प्रकारे त्याने मॅरेथॉन पूर्ण केली. 

          दुसऱ्याला आपली आधीची कामगिरी सुधारायची होती आणि त्याने ती गोष्ट केली. तिसर्या माणसाने आयुष्यात कधीही मॅरेथॉनमध्ये भाग घेतला नव्हता. त्याचा उद्देश स्पर्धेचे पूर्ण अतर धावणे एवढाच होता आणि ते त्याला जमलं. यावरून आपल्या काय लक्षात येत? मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचे उद्देश वेगवेगळे होते आणि तिघांनीही ते पूर्ण केले. म्हणून शर्यत जिंकली नाही तरीही आपापल्या उद्दिष्टात ते सर्वचजण सफल झाले. मार्क ट्वेनने म्हटल्याप्रमाणे, सन्मानाला लायक असूनही तो न मिळण हे लायकी नसताना सन्मान मिळण्यापेक्षा चांगल असतं. कारण एखादी गोष्ट मिळण्यापेक्षा ती मिळवण्याला लायक असण्यातच खरी प्रतिष्ठा आहे. माणसाने फक्त जिंकण्याचेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर जिंकण्यापासून मिळणारे इतर अनपेक्षित फायदे त्याला कदाचित मिळणार नाहीत. जिंकण्यापेक्षासुध्दा सन्माननं जिंकणं आणि जिंकण्यापेक्षा सन्मानाने हरण्यात कदाचित तयारीचा अभाव दिसून येईल. परंतू अप्रामाणिकपणे जिंकण्यात चारित्र्याचा अभाव दिसून येतो.

         आपण काहीही गैर केलं तरी ते उघडकीला येणार नाही हे माहित असताना एखादा माणूस कसा वागेल, यावरून त्याच्या चारित्र्याची खरी कल्पना येते. स्वतःची सचोटी, प्रामाणिकपणा याच्याशी तडजोड करून झटपट जिंकण्याचा मार्ग स्वीकारणे हे काही योग्य नाही. तुम्ही कदाचित विजयी ठराल . पण, वस्तुस्थिती माहिती असल्यामुळे तुम्हाला विजयाचा निखळ आनंद कधीही मिळणार नाही. एखादे पदक मिळवण्यापेक्षा एक चांगला चारित्र्वान माणूस म्हणून मान्यता मिळवणे अधिक महत्वाचं असतं.

2 comments: