Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 27 February 2021

संतांची कामगिरी- निबंध

 


संताची सामाजिक कामगिरी / शिकवण

संतांची सामाजिक कामगिरी / शिकवण

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण असे सांगून संतांनी माणूस घडवला, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ अशी शिकवण देऊन समाज घडवला, ‘मराठा तितुका मेळवावा या उपदेशातून राष्ट्र घडवले, असे व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंतच्या अभ्युदयाचे दिग्दर्शन ही संतांची सामाजिक कामगिरी व शिकवण होय. संत म्हणजे केवळ देवाचा भक्त नव्हे. तो खराखुरा समाजशिक्षक असतो. स्वतःच्या आचरणाने समाजापुढे आदर्श ठेवून लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविणारा पुरुष संत या पदवीस पात्र ठरतो. रंजलेल्या-गांजलेल्या लोकांना जवळ करणाराच संत होयअसे संत तुकाराम म्हणतात. तो देवाची भक्ती करतो किंवा नाही, आणि करत असेल तर कोणत्या देवाची भक्ती करतो हैे प्रश्न महत्त्वाचे नाहीत. ‘अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ‘ आहे का हेच महत्त्वाचे आहे, मग त्याच्या गळ्यात माळ असो अथवा नसो. तरीही देवाची भक्ती हा संतांमध्ये अनिवार्य गुण समजला जातो.
संत हे खरोखरीच समाजशिक्षक होते. हे संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, मुक्ताबाई, चोखामेळा, रामदास आणि अलीकडील काळात गाडगेबाबा, तुकडोजी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी विचार, उच्चार व आचार याद्वारे समाजाला वेळोवेळी हितोपदेश केला आहे. त्यांचा हा उपदेश तात्कालिक स्वरूपाचा नसून चिरंतन स्वरूपाचा आहे. तो महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून त्यात समग्र संसारातील अखिल मानवजातीच्या हितासाठी अंतिम मूल्यांचा शोध आहे. ‘आधी केले मग सांगितले किंवा ‘बोले तैसा चालें या तत्त्वानुसार संतानी स्वतःच्या आचरणाद्वारे समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ज्ञानेश्वरांनी स्वतःचा संसार केला नसला तरी अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।’ असा विश्वाचा संसार उभा केला आहे आणि या विश्वाचा संसार सुखी होण्यासाठी त्यांनी विश्वात्मक आदिपुरुषाला – ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो। मैत्र जीवाचे।। दूरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म पाहो। अशी प्रार्थना करून ‘वांछिल ते ते लोहो । प्राणिजात’ असे म्हटले आहे. चिरंतन आनंद प्राप्त करण्याच्या दृष्टीने ऐहिक जीवनातील एकांतिक उत्कर्ष थिटा पडतो म्हणून ऐहिक जीवनाला संतांनी अध्यात्माची भरभक्कम बैठक दिली आहे. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरांनीच केवळ प्रपंच परमार्थरूप करण्याचा उपदेश केला नसून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी संतानीही तसाच उपदेश केला आहे. रामदासांनी प्रपंच नेटका करण्याची युक्ती सांगितली तर तुकारामांनी ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी असा महामंत्र समाजाला दिला आहे. पुष्कळ लोकसंतावर टीका करताना म्हणतात की, संतानी लोकांना नेभळट व निष्क्रीय बनविसे ईश्वरभक्तीचा पळपुटा मार्ग दाखवून लोकांची दिशाभूल केली. दया-क्षमा शांतीचा उपदेु । करून लोकांची प्रतिकार प्रवृत्ती नामशेष केली. परंतु या टीका अवास्तव असून टीकाकारांना संताची भूमिका समजलीच नव्हती असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. वास्तविक पाहता रंतांचा उपदेश विहित कार्यापासून परावृत्त करणारा नसून प्रवृत्त करणारा आहे. चिका अविरत कार्य करण्यास शिकविणारा आहे. तसेच संतांनी समाजाला देववाद शिकविला असाही एक आक्षेप त्यांच्यावर घेण्यात येतो. संतानी दैववाद शिकविला खरा परंतु भोळा देववाद शिकविला नाही. ‘मना त्वांचिरे पूर्व संचित केले। यासारखे भोगणे प्राप्त झालें किंवा সारब्धेचि जोड़े धन, प्रारब्धेचि वाढे मानः ‘प्रारब्धेचि भरे पोट। तुका करीना बोभाट असाच उपदेश संतांनी केलेला आहे. ‘बहुत सुकृताची जोडी। म्हणोनि विठ्ठल आवडी’ अशी संतांची श्रद्धा आहे. बुडता हे जन, न देखवे डोळा आणि म्हणून संतांना त्यांचा कळवळा येतो. मनुष्याला सर्वात जास्त भीती मृत्यूची वाटते. परंतु ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अ असे स्वतःचे मरण स्वतःच पाहण्याचे महान धेये संतानी लोकांना शिकवून मरणाच्या भीती खुळच लोकांच्या डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच संतांनी शिकविवेळ त्यागाची भावना ही समाजहितकारक आहे. एकंदरीत, संतांनी वेदान्त व व्यवहार, एकाग्रता व चतुरस्त्रता, आत्मनिष्ठा आणि लोकसंग्रह निःस्पृहता आणि चातुर्य, प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घालून समाजाला सन्मार्गाकडे वळविले. संताच्या याच संदेशातून लोकांना जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गवसला. अशाप्रकारे संतांनी संसाराची अवहेलना करण्यास सांगितले नसून उत्तम संसार कसा करावा हे वारंवार सांगितले आहे. त्यांनी समाजाला विचारजागृत व कार्यप्रवण केले. व्यक्तीचा विकास व समाजाचे कल्याण करण्यास आवश्यक असलेल्या भक्ती, ज्ञान, वैराग्य, दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांचाच त्यांनी वेळोवळी पुरस्कार केला.
तात्पर्य असे की संतांचे कार्य हे समाजाभिमुख असून देशाच्या उत्थानासाठी व समाजाच्या शुद्धिकरणासाठी त्यांनी कालानुरूप प्रयत्न केलेला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कृतीतून व उक्तीतून, समाजाला तशा प्रकारचे मार्गदर्शनही केलेले आहे. अर्थातच सखोलदृष्टीने विचार केला असता संताचे कार्य हे समाजाला मारक नसून तारकच होते असे स्पष्ट दिसून येते. यादृष्टीने संताचे बहुमोल कार्य, त्यांची भूमिका आणि खऱ्या शिक्षकांची धारणा या त्रिवेणीसंगमाचे सूत्र खालील काव्यपंक्तीवरून दिसून येते.
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठिण वज्रास भेद ऐसे।।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा।

No comments:

Post a Comment