Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday, 29 April 2022

१ मे महाराष्ट्र दिन चिरायु होवो

    

     महाराष्ट्र राज्य स्थापनादिन १ मे 

भारतात बोलल्या जाणाऱ्या भागाची व त्या भाषांच्या बोलींची संख्या सुमारे १६०० आहे . असामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी मल्याळम ,मराठी उडिया ,पंजाबी संस्कृत सिधी तमीळ तेलगु व उर्दू या भाषा प्रमुख आहेत त्यातील सिंधी व काश्मिरी या भाषा कोणत्याही राज्याच्या राजभाषा नाहीत .जम्मू  काश्मिरची राजभाषा उर्दू आहे. एक भाषा बोलणाऱ्या जनतेच्या सलग प्रदेशाचे एक असणे म्हणजे भाषावार प्रांतरचना होय. इंग्रज काळात एकेका प्रांतात अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रदेश असायचे तसेच एक भाषा बोलणारे लोक अनेक विभागलेले होते. एक भाषिक लोकात सहज एकी होते. ती होऊ नये म्हणून इंग्रजांंनी जाणून बुजून अशी प्रांतरचना केलेली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांत करायचे आपल्या सरकारने ठरविले एक भाषा बोलणाराचे एक राज्य असले तर सांस्कृतिकदृष्ट्या ते राज्य एकसंघ बनते आणि त्या राज्याचा विकास ही योग्यरित्या होतो. या उद्देशाने भाषावार प्रांतरचना होणे जरुरीचे होते. केंद्र सरकारने सन १९५६ मध्ये भारतातील बहुतेक सर्व राज्याची भाषावार प्रांतरचना केली न गुजराती व मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जनतेचे एक द्विभाषिक बनविल गुजरात व महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये न करता केवळ मुंबईच्या प्रश्नावरून बनविले होते. या द्विभाषिकाविरुद्ध गुजरात महागुजरात परिषद आणि महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती लढा देण्यासाठी कार्यरत झाली द्विभाषिकाबद्दल जनतेत असंतोष होताच सतत चार वर्ष जनतेने आदोलने केल्यानंतर अखेर १९६० रोजी या द्विभाषिकाची मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन बनविण्यात आली मराठी भाषिकाची कित्येक दिवसाची मागणी मान्य झाल्याने मे १९६० हा दिवस महाराष्ट्रात अत्यानंदाचा दिवस होता. मराठी भाषिकाच महाराष्ट्र राज्य या दिवशी अस्तित्वात आले व मराठी ही राजभाषा झाली. ही आपल्या अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हा वाढदिवस आपण अतिशय साजरा करीत असतो. महाराष्ट्र राज्य से वीराचे संताचे राज्य आहे तसेच ते कलावंताचेही राज्य आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग आणि दुर्गम शिखराच्या उपलब्धतेमुळे साहजिकच शिल्पकलेचा महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त विकास झाला दुर्ग, देवालय लेणी, स्तूप, मूर्ती हे महाराष्ट्राच्या शिल्पकलेचे अलौकिक रूप आहे आणि वेरुळ अजितने तर महाराष्ट्राचे नाव जागतिक चलेच्या नकाशात अमर केल शिल्पकलेप्रमाणेच चित्रकला, गायनकला, काव्य, साहिल नाट्यकला इतर अनेक कलामध्ये महाराष्ट्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे अशा या महाराष्ट्र राज्यास १मे रोजी प्रणाम आमुचा जय हिंद जय महाराष्ट्र!!!

No comments:

Post a Comment