दैनंदिन शालेय परिपाठ
श्लोक
रत्नाकरापीत पदाम् हिमालय किरीटनीम् ब्रम्ह राना रत्नाइयां वन्दे भारतम् ॥
- रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पादप्रक्षालन करतो, हिमालय जिचा मुकुट आहे आणि ब्रह्मपी राजर्षी रुपी रत्नानी जी समृद्ध आहे. त्या माझ्या भारतमातेला मी चंदन करतो.
→सुविचार
:- माता, मातृभूमी व मातृभाषा सर्वश्रेष्ठ आहे.
• मातेसारखे छत्र नाही, मातेसारखी गती नाही.
• आईसारखे महान दैवत जगात दुसरे नाही.
→ चिंतन
आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. मुलाचा जगातील पहिला गुरु म्हणजे आई. तीच त्याला जगात आणते. तीच जगात जगण्याचा मार्ग दाखविते. ती प्रसंगी वज्रासारखी कठोर होऊन तर कधी साथीहून मऊ होऊन मुलांची मूर्ती घडविते. तिचे मन गंगेसारखे विशाल व हिमालयासारखे घोर असते कर्तबगार स्त्री आपल्या मुलांना कर्तबगार व्यक्ती म्हणून घडवू शकते शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात जिजाबाईचा मोलाचा वाटा आहे आईचा महिमा लहानचोर सगळेच वर्णन करतात.
कथाकथन
सत्य शिव सुंदर जिजाऊ
चारशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हातील सिंदखेडराजा येथे ॐ जिजाऊ जाधव हिचा जन्म झाला. आईचे नाव म्हाळसाबाई जिजाऊ हे ट्रीपल एम टॉनिक आहे. ते म्हणजे मन मनगट आणि मस्तक' कर्तबगार माँ जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले पाटील यांच्यासोबत झाला मुलगी जन्माला आली तरी मुलाप्रमाणे तिचे स्वागत करा असे आज | शासनदरबारी सांगण्यात येत आहे. परंतु ४०० वर्षापूर्वी जिजाऊंच्या जन्माचा आनंद व्यक्त करणान्यांसाठी वडील लखुजी जाधव यांनी हत्ती वर बसून साखर वाटली आई ही मुत्मची पहिली शाळा असते. तर शाळा ही समाजाची आई असते गुलाम माता गुलाम मुलांना जन्म देत असते. स्वयंप्रज्ञेची स्वाभिमानी जिजाऊ आई असली तरी ती शिवाजीला जन्म देते। १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका पराक्रमी व नीतिमान योद्धाचा जन्म झाला. त्याचे नाव शिवाजी शिव म्हणजे चांगले पवित्र, मंगलमय, जेथे शिव म्हणजे पवित्रता व शुद्धया असते. 'सत्य असतं तेथे सुंदरता असते पती शहाजीला कैदेत ठेवल्यावरही आदिलशाहाला किल्ला परत न करणारी जिजाऊ, शिवाजींचा पहिला मुलगा संभाजीचा मृत्यू झाल्यानंतरदेखील अफजलखानाची भेट घेण्यासाठी शिवाजीला पाठविणारी जिजाऊ, पुरंदरच्या वेढ्यातून शिवाजीला सोडविणारी जिजाऊ, सती प्रथेला त्याकाळी विरोध करणारी जिजाऊ, ४०० वर्षापूर्वी स्त्रिया शूद्र व गुलामीचे जीवन जगत असताना मुलाला समोर करून किल्ले लढविणारी लढाऊ बाण्याची जिजाऊ, रयतेचे | कल्याण करणारी, राज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला घातले असे शिवाजींना ठकावून सांगणारी जिजाऊ, अशुभतेचे प्रतीक म्हणून पुण्याच्या भूमीवर | नांगर ठेवणाऱ्या आदिलशाहाची भीती न बाळगता जमीन पवित्र असते, ती अशुभ कधीही नसते, असे बजावून तो नांगर हटविणारी जिजाऊ, अशी जिजाऊंची अनेक ऐतहासिक रूपे आहेत. जिजाऊ म्हणजे आदर्श माता, आदर्श पत्नी आणि आदर्श कल्याणकारी राज्यनिर्माती आहे. धर्मग्रंथ व धर्माचे ठेकेदार तेव्हाही होते, आताही आहेत. पण तेव्हा जावक रूढीपरंपरांमुळे व मनुस्मृतीच्या चौफेर जाचामुळे महिलांचे जीवन दुःखीत, कष्टी व गुलामीचे होते, त्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात जिजाऊंनी जो निर्भीड बाणा दाखविला ती अस्मितेची ललकारी बनली, त्या सद्प्रवृत्तीला भारतीय इतिहासात तोड नाही... समस्त स्त्रियांना माँ जिजाऊंचे जीवन कार्य लक्षात येईल व ती स्वातंत्र्याची प्राणज्योती आहे, हे समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजत सत्य, शिव, आणि सुंदरतेचा मिलाफ दिसेल. प्रत्येक कुटुंबाला कदाचित वाटत असणार की, शिवाजीसारखा शूर, बीर, कर्तबगार मुलगा जन्माला यावा. परंतु शिवाजी जन्माला यायचा असेल तर नुसते शहाजी होऊन भागत नाही. त्यासाठी लागते एक सर्वागसुंदर पण लढवय्यी जिजाऊ ! सुविचार:- माता, मातृभूमी व मातृभाषा सर्वश्रेष्ठ आहे. मातेसारखे छत्र नाही, मातेसारखी गती नाही. आईसारखे महान दैवत जगात
दिनविशेष
राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन - १६७४ :
जिजाबाई म्हणजे शिवरायांच्या माथ्यावरची कल्पतरूयी छाया होती. एक अत्यंत कर्तृत्वशाली जीवन ती जगली. ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडविला तो शिवाजी या महान स्त्रीने घडविला. महाराष्ट्राव्याच नव्हे तर जगाच्या | इतिहासात आपल्या तेजाने झळाळणारे असे ते एक स्त्री रत्न आहे. निजामशाहीतील एक प्रतिष्ठीत सरदार सिंदखेडचे लखुजी जाधव यांची ती कन्या. लहान वयात लग्न होऊन शहाजी भोसले यांची पत्नी झाली. महाराष्ट्रात असलेल्या ओसाड वाळवंट झालेल्या 'पुनवडीत' तिने सोन्याच्या फाळाने नांगरून भावी स्वराज्याच्या वैभवाची बीजे रोवली. लहानपणापासून तिने शिवबाला आधार दिला आणि तेजही दिले. त्याच्या मनावर रामायण महाभारताचे आदर्श बिंबविले. तऱ्हेतऱ्हेच्या शस्त्रास्त्रांचे शिक्षण देऊन पराक्रमी बनविले. सज्जनांचा पुरस्कार, दांभिकांचा धिक्कार, दीन दुबळ्यांचा कैवार, भ्रष्टांवर प्रहार करणारी जिजाऊ होती. आपल्या पुत्राचा पराक्रम तिने पाहिला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा असा राज्याभिषेकाचा सोहळा पाहिला अन तृप्त मनाने राज्याभिषेकानंतर अवघ्या अकराच दिवसानंतर तिने आपले डोळे मिटले.
→ मूल्ये
निर्भयता, स्वाधीनता, कर्तव्यदक्षता.
→ अन्य घटना • संत निवृत्तीनाथ यांनी समाधी घेतली- १२९७ • गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन १८९५ • स्वातंत्र्यसेनानी कृ. द. धर्माधिकारी ऊर्फ नाना धर्माधिकारी यांचे निधन १९९३
→ उपक्रम•
आपल्या आईचा जन्मदिन आदराने साजरा करा. • मदन पाटिल लिखीत 'जिजाऊ साहेब' कादंबरीचे वाचन करा. आईची थोरवी सांगणारी वचने व कविता जमवा.
→ समूहगान
हा देश माझा याचे भान, जरासे राहू यारे.....
→ सामान्यज्ञान • १२३६ मध्ये दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली मुस्लिम महिला रझिया सुलताना. हुमायूननामा या हुमायूनवर लिहिलेल्या पर्शियन भाषेतील ग्रंथाची लेखिका 'बाबरकन्या' 'गुलबदन बेगम' या होत्या
No comments:
Post a Comment