Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 14 March 2021

बोधकथा- सावित्रीबाई फुले

                   सावित्रीबाई फुले

 (३ जाने. १८३१, मृत्यू १० मार्च १८९७) : 


 

           महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व बहुजनांचे उध्दारकरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांच्या खाद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व समाजोध्दाराचे कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या हिच्याशी त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. पण लग्न झाल्यावर त्यानी ज्योतिबांकडून आवश्यक ते शिक्षण घेतले सन १८४८ साली ज्योतिबानी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्याना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाड शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ ब्राह्मण लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वगैरे फेकीत. पण सावित्रीबाईनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. 

          ज्योतिबांचे जुन्या विचाराचे वडील कर्मठ लोकांनी त्यांचे कान फुकल्यामळे बिथरले आणि त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर घालवून दिले. त्या प्रसंगीही पतीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या व त्यांच्याबरोबर त्याही घराबाहेरा पडल्या. पुढे त्या काळी 'अस्पृश्य' मानण्यात येणाऱ्या जातीतील मुलांसाठीही ज्योतिबांनी शाळा काढली, आणि त्यांनाही शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईनी जीव ओतून पार पाडली. पुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून किंवा अपत्यहत्येपासून वाचविण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधगृह' काढले. तेव्हा अशा तीस-पस्तीस स्त्रियांना आईची माया देऊन त्यांची बाळंतपणे सुध्दा त्या माऊलीने केली. साबित्रीबाईचे मन कधीही विचलित झाले नाही.

         भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. म्हणून पतिनिधनानंतरही त्यानी सत्यशोधक समाजाचे. 'समता आंदोलन' पुढे चालू ठेवले. त्या कविताही करीत १८५४ साली त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. 'मातोश्री सावित्रीबाईची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिध्द करण्यात आले. 

         १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' व ज्योतिबांची भाषणे या पुस्तकांचेही त्यांनी संपादन केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाईना शतकोटी प्रणाम.

No comments:

Post a Comment