Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 14 March 2021

सफलतेचा मंत्र

                    सफलतेचा मंत्र 



        ज्या व्यक्तीला चांगल्या सवयी असतात त्या व्यक्तीचे जीवन सफल बनते. त्यालाच सुखशांती व समाधान लाभते. चांगल्या सवयीच्या व्यक्तीचे चारित्र्य श्रेष्ठ असते. ती व्यक्ती सुशील स्वभावाचा आरसा असते. त्यासाठी चागल्या सवयीचे बीजारोपण बाल्यावस्थेत केले पाहिजेत. कारण लहानपणची सवय कायम टिकते. 

          बालपणीच वाईट सवयीच्या आहारी गेल्यास यश मिळत नाही. माणसाचे मन चंचल असते. चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी मनाला चटकन भुरळ पाडतात. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात, 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर, किती हाकालू हाकालू फिर येती पिकावर. चांगल्या सवयी कष्टाने जडवून घेणे गरजेचे असते. चांगल्या सवयीमुळे माणसाची योग्यता व लायकी सतत वृध्दिंगत होत असते चांगल्या सवयी जडवून घेण्यासाठी प्रवाहाच्या विरूद्द पोहावे लागते. चांगल्या सवयी असलेल्या जनसमुहापेक्षा वाईट सवयीचा जनसमूह मोठा आहे. त्यापासून स्वत:ला दूर ठेवता आले पाहिजे. त्यासाठी स्वतःला क्षणोक्षणी कार्यरत ठेवले पाहिजे.

              जगात वावरताना योग्य-अयोग्य ओळखायला शिकले पाहिजे. व्यवहार व कौशल्याची जोड घालून काम करणे इष्ट असते. कामापेक्षा जास्त बडबड करणे टाळणे हितावह असते. मनात समृध्दीचा विचार ठेवा पण त्याबरोबर आपले सुप्त सामर्थ्य ओळखा. आपल्या ध्येयाकडे व यशोमंदिराकडे घोडदौड करताना संकट आल्यास न डगमगता सामना करण्याचे शिका. संकटावर मात करणे हाच खरा पुरूषार्थ आहे. मनात निराशेला जागा देऊ नका. इच्छाशक्ती प्रबळ बनवली पाहिजे. आळस मोडून योग्य मागनि कार्य करा. यशासाठी आत्मविश्वास ठेवा. 

       आत्मविश्वासामुळे अतरंगातील दारे उघडी होतात. नशिबावर विश्वास ठेवणे म्हणजे भेकडपणाचे लक्षण होय. यशस्वी ठरलेल्या माणसाचे अनुकरण करा. यश मिळावे यासाठी इच्छारूपी बियाणाला परिश्रमाचे खतपाणी घाला. मनात सदैव शुभ विचारांचे चिंतन करा. शुभ विचाराना श्रम व प्रयत्न याची जोड द्या. श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. यशासाठी केवळ परमेश्वरावर विसंबून राहणे अयोग्य आहे. आपले हातच आपणाला यश मिळवून देत असतात. म्हणूनच ग.दि. माडगुळकर म्हणतात, नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी ।"

आपले मन नेहमी प्रसन्न ठेवा, कारण मनाचा शरीरावर प्रभाव पडतो. हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. 'मन करारे प्रसन्न, सर्व सिंध्दीचे कारण, कोणत्याही गोष्टीमुळे रागावू नका. मनाच्या रोगामुळे शरीर रोगी होते. मनात चांगल्या गोष्टींचे मनन करा. कारण विचारामुळेच तुमचे भाग्य घडते. श्रम व चिकाटी यातून यश मिळते. शुभ सत्य बोलण्याची सवय लावा. व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा. स्वतःच्या गुणदोषांची यादी करा. तोडाने उत्साहाचे व धैर्याचेच शब्द उच्चारा संभाषणात गोड बोला प्रामाणिकपणा जपा. कोणाला दिलेला शब्द काटोकोरपणे पाळा. दुसऱ्याच्या वेळेची किंमत ओळखा. इतरांन मदत करा व स्वतःला सहकार्य मिळवा. इतरांबद्दल तिरस्कार बाळगू नका. त्यामुळे आपल्याला कालांतराने दुःख होऊ शकते. सुखी समाधानी जीवनासाठी इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे. ईश्वर सर्वांना समान संधी देत असतो. त्यासंधीचा योग्य फायदा घ्या. यश हे तुमचेच असते. पण ताबडतोब अपेक्षा करू नका.

          यश मिळायला जर वेळ लागला तर हाती घेतलेले कार्य सोडू नका. यशासाठी हातावर विश्वास व ईश्वरावर श्रध्दा ठेवली पाहिजे.' मानव जन्म हा दुर्मिळ आहे. तो अनेक जन्ममरणाच्या फेऱ्यानंतर मिळालेला असतो असे आपण नेहमीच ऐकत असतो.मग अशा दुर्मिळ जीवनात कसे जगायचे ते तुम्ही ठरवा. जीवन सर्वच जगत असतात. पण जगण्याला अर्थ असला पाहिजेत. मानसन्मानाने जगायचे असेल तर चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न आज आणि आतापासूनच सुरू करा. जगण्याचा अर्थ तुम्हाला आपोआप कळू लागेल.

No comments:

Post a Comment