Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 14 March 2021

सत्पुरुषाच्या संगतीचा परिणाम

 सत्पुरूषाच्या संगतीचा परिणाम 



        फार वर्षापूर्वीची गोष्ट एक श्रध्दावान साधू वाराणसीत रहात होता.एकदा तो काही कामानिमित्त जहाजातून परदेशी जाण्यास निघाला. त्याच जहाजातून एक न्हावीही प्रवासा जाणार होता. त्याच्या बायकोची साधूवर श्रद्धा होती. ती साधूला म्हणाली, महाराज माझा पतीही आपल्याच जहाजातन येत आहे. आपण त्याची काळजी घ्या. साधून तिला तिच्या नवऱ्याला मदत करण्याच वचन दिल. दोघे जहाजावर चढले पुढे सात दिवस त्याचा प्रवास व्यवस्थित झाला पण आठव्या दिवशी भयंकर वादळ होऊन जहाजाचे तुकडे झाले. 

        साधू आणि न्हावी एका फळीच्या आधारान तरंगत एका लहानशा बेटाच्या किनाऱ्याला लागले त्या बेटावर जास्त फळंमुळं नव्हती. साधू जो थोडी फार कंदमुळ, फळ मिळत होता. तो खाऊन आपला निर्वाह करत होता. पण न्हाव्याला असल्या जेवणाचा कंटाळा आला, तो पक्षाना मारून खाऊ लागला. त्यान साधूलाही पक्षी मारून खाण्याचा आग्रह केला, पण साधून कधीही ते खाल्ले नाही. फळे मिळत आहेत तेवढे भरपूर आहेत असा विचार करून तो ते खाण नाकारत होता. 

          साधूची अचल अदा पाहून त्या बेटावर रहाणारा एक नागराज प्रसन्न झाला. तो त्याच्या जवळ येऊन म्हणाला, है साधू तुझी श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुझ्यासाठी मी माझ्या देहाची होडी करून तुला ज्या स्थळी जावयाचे आहे त्या स्थळी सोडतो. साधून नागरााजला नमस्कार केला. त्याने तयार केलेल्या होडीत बसून तो न्हाव्याला म्हणाला, बाबारे, तुला जर माझ्या सोबत यावयाचे असेल तर चल. तेव्हा नागराज म्हणाला, या न्हाव्याला होडीत घेता येणार नाही. तो खूप दुष्ट आहे. त्याच्यासाठी ही होडी मी निर्माण केली नाही. 

        साधून नागराजाला विनंती केली की, तो जरी पापी असला तरी तो माझ्यासोबत आलेला आहे. मी जे पुण्य केल असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे. न्हावी साधूला संस्कार करून म्हणाला. तुझ्या या देणगीच मी अभिनंदन करतो. आजपर्यंत मी पापच केल आहे. पण तुझा सहवास हेच पुण्य माझ्या पदरी आहे. आणि तुझ्या पुण्याचा वाटेकरी करून तू मला फार ऋणी केल आहेस. मग नागराजान न्हाव्याला होडीत येऊ दिल. तेंव्हा समुद्राचे रक्षण  देवतेने होडी चालवण्याचे काम आपल्या हाती घेतले. त्या बेटावर सापडणारी अमूल्य रत्ने साधूने त्यांच्याबरोबर आणली होती. त्या दोघांना इच्छित स्थानी असून सोडल्यावर देवता म्हणाली, "श्रध्दा आणि शील या गुणाच हे फळ आहे. या साधूच्या अंगी हे गुण असल्यान नागराज स्वतः त्याच्यासाठी होडी घेऊन पोहोचवायला आला. माणसान अशा सत्पुरूषाचाच सहवास करावा. या न्हाव्याने जर साधूची संगत धरली नसती तर समुच त्याचा नाश झाला असता ! अस बोलून देवता आणि नागराज दोघेही निघून गेले. साधूनं आपण आणलेल्या धनाचे दोन भाग करून त्यातला न्हाव्याला दिला. साधूच्या संगतीमुळे मिळालेली संपत्ती न्हाव्याला जन्मभर पुरली. 

1 comment: