Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 1 March 2021

डॉ. अब्दुल कलाम-मिसाईल मॅन- भाषण

         डॉ. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन 



        माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही माणसे भारत भूमीवर जन्माला आली. अचल ध्येयवाद आणि दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसांचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत असते.
          साऱ्या भारत देशातील विद्यार्थी व युवकांसाठी आदर्शाचा दीपस्तंभ ठरावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम होय. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. वडिलांचा साध्या बोटी बनवण्याचा व्यवसाय होता व भावाचे पानाचे दुकान होते. 
      त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. अशा वेळी कलामांनी जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण चालू ठेवले. सध्या समाजामध्ये सर्व अनुकूल असणाऱ्या घरातील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रतिकूलतेतून शिकणाऱ्या कलाम साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. 
      संरक्षण संशोधन क्षेत्रातून १९५८ साली 'डिआरडिओ' या संस्थेतून कलामांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यानंतर 'इस्रो' या संस्थेतून अंतराळ संशोधन कार्य सुरू के. १९८२ मध्ये पुन्हा 'डिआरडिओ मध्ये दाखल होऊन क्षेपणास्त्र विकासाचा नियोजित कार्यक्रम तयार केला.             अमेरिकेने तंत्रज्ञान देणे नाकारल्यावर कलामांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी प्रक्षेपणास्रांची निर्मिती करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या या अथक परिश्रमातूनच पृथ्वी, नाग, आकाश, त्रिशूल, अग्नी इ. प्रक्षेपणास्त्रांची निर्मितीला यश आले. 
     संरक्षण साधनांच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हा संशोधक अविरतपणे झटला. स्वदेशातच शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या उपयोगाने देशाला स्वावलंबी बनवणारा हा संशोधक यात्री परदेशात शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणाऱ्या आजच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचा दीपस्तंभच आहे. 
          संशोधन काळात दिल्लीमध्ये राहायला मोठे निवास मिळत असताना देखील कलामांनी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहणेच पसंत केले. हाच शास्त्रज्ञ भारताच्या संरक्षण खात्याचा सल्लागार व त्यानंतर भारताचा राष्ट्रपतीसुद्धा झाले. 
        अनेक नामांकित विद्यापिठाकडुन सन्मानाच्या पदव्या, अँवॉर्डस् कलमांना देण्यात आले आहेत. तसेच भारत सरकारकडून 'पद्मविभूषण' व 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मानही त्यांना बहाल करण्यात आला आहे. परंतु या साऱ्या यशाचे श्रेय डॉ. कलाम स्वत:कडे न घेता संशोधनात मदत करणाऱ्या आपल्या सहकारी यांना देऊन टाकतात. 
      त्यांच्या या मनाच्या मोठेपणातून एकीतून प्रगतीकडे जाण्याचा आणि संघटनात्मक मार्गाने राष्ट्रविकास साधण्याचा आदर्श साऱ्या भारतवासियांपुढे उभा राहतो. राष्ट्रपती पदाचा कालखंड पूर्ण झाल्यावर केवळ 'दोन सुटकेस' हातात घेऊन राष्ट्रपतीभवन सोडणारा हा राष्ट्रपती साऱ्या देशवासियांना जणू आदर्श निष्काम कर्मयोगीच भासला होता. युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्याप्रमाणे विचार करावा व विचारांना कृतीत आणावे. 
          आपली राष्ट्रीय दृष्टी हेच आपले जीवनकार्य आहे असे समजून कार्य करावे हा डॉ. कलामांचा संदेश भारतीय तरुणांनी शिरोधार्य मानून आपले आचरण करावे.
             जय हिंद!

No comments:

Post a Comment